राजकारण

लोकनेते आमदार सिद्धार्थ खरात

 

लोकनेते आमदार सिद्धार्थ खरात

 

नेते येतात, नेते जातात… पण खूप थोडे नेते असे असतात की ते लोकांच्या मनात घर करतात आणि खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे लाडके साहेब – मा.श्री. सिद्धार्थ रामभाऊ खरात साहेब.
सिद्धार्थ खरात हे नाव केवळ एका पदाने मोठं नाही, तर जनतेच्या मनातलं मोठेपण हेच त्यांचं खरं स्थान आहे. लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत–कोणत्याही संकटात, कोणत्याही अडचणीत सर्वप्रथम आठवणारं नाव म्हणजे खरात साहेब. कारण लोकांचा ठाम विश्वास आहे की “खरात साहेब आहेत… ते आपल्या पाठीशी उभे राहतील”.
संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे सिद्धार्थ खरात. आयुष्यात अनेक वादळं आली, असंख्य अडचणी आल्या पण त्या प्रत्येक संकटाला पुरून उरणारा आणि कधीही न डगमगणारा नेता म्हणजे आमदार सिद्धार्थ खरात होय. महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या प्रश्नावर ठामपणे आवाज उठवणारा नेता म्हणजे आमदार सिद्धार्थ खरात होय.
ताडशिवनी गावच्या चिखलमय वाटा तुडवत सुरू झालेला प्रवास महाराष्ट्राच्या मुंबई मंत्रालयात अवर सचिव ते थेट विधानसभा सदस्यता पर्यंत पोहोचलेला हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द, अभ्यास, सचोटी, डोळसवृत्ती आणि जनतेवरील अपार प्रेम यांचं जिवंत उदाहरण आहे. विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी आपल्या थेट आणि रोकठोक स्वभावाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला सडो की पडो करून शेतकऱ्यांचा आवाज उठवित आहेत. त्यांच्या प्रत्येक अभ्यासपुर्ण भाषणाने सत्ताधाऱ्यांच्या अंगावर काटा आणला म्हणून लोकांना विश्वास आहे “हा आमचा खरा आवाज आहे”.
आमदार सिद्धार्थ खरात नेतृत्वाखाली विकासकामांची अक्षरशः गंगा वाहिती होत आहे. रस्ते, वीज, पाणी,धरणे ,एमआयडीसी, शाळा, महाविद्यालयं, उद्योग, शेतकऱ्यांसाठी योजना मतदारसंघाच्या प्रत्येक क्षेत्रात पोहोचत आहे. त्यांच्या कार्याची साक्ष जनता देत आहे. प्रत्येक गावा-गावातून आशीर्वाद मिळाला, त्या प्रत्येक गावात विकासाची चाहूल अनुभवली जात आहे. आमदार सिद्धार्थ खरात हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर मतदारसंघासह महाराष्ट्राच्या जनतेलाच आपला परिवार मानून सतत जनतेचा विचार करणारे लोकनेते आहेत. सत्ता येते, सत्ता जाते पण आमदार सिद्धार्थ खरात साहेबांवरच प्रेम, त्यांच्याबद्दलचा विश्वास आणि त्यांच्यावरची निष्ठा मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून कधीही जाणार नाही. कारण खरात साहेब हे फक्त एक राजकारणी नाहीत, तर ते जनतेचे आपलेसे माणूस आहेत, कार्यकर्त्यांचे आधार आहेत, शेतकऱ्यांचे खरे आवाज आहेत. अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करणारे, बेरोजगारांच्या हाताला काम देणारे आणि अंधारलेल्या झोपडीत उजेड करणारे आहेत. त्यांना आधार देऊन मोठ्या पदापर्यंत घेऊन जाणारे आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे हे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार सिद्धार्थ खरात साहेब आहेत.
आमचं भाग्य आहे की आम्हाला खरात साहेबांसारखा नेता लाभला. आमच्यासाठी ते केवळ एक नेता नाहीत, तर आमचा श्वास, आमचा ध्यास, आमचं सर्वस्व आमचे आधारस्तंभ आहेत. संकटात असताना खंबीर पणे उभे राहणारे, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक दुःखात सहभागी होणारे आणि आनंदाच्या क्षणात आशीर्वाद देणारे नेते म्हणजेच आदरणीय खरात साहेब.
आज अशा या संघर्षयोध्याच्या बद्दल मनात आपुलकी, जिव्हाळा, हा केवळ एक शब्दांचा खेळ नाही, तर त्यांच्या कार्याचा, त्यागाचा, संघर्षाचा आणि लोकांवरील अपार प्रेमाचा उत्सव आहे. अशा माझ्या राजकीय दैवताला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खऱ्या आधारस्तंभाला, असंख्य कार्यकर्त्यांचा जीवाचा जीव असणारे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात साहेब यांच्या कर्तृत्ववान कामगिरीस मनःपूर्वक, हार्दिक शुभेच्छा…!!!

आपला एक जिव्हाळा… संतोषजनक
✍️….

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका