मा. प्रदीप पाटील : निष्णात कर्तव्यनिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी

|| निरोप नव्हे… हा हृदयातील जिव्हाळा ||
मा. प्रदीप पाटील : निष्णात कर्तव्यनिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी
एक निष्णात, कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून मा. प्रदीप मुरलीधर पाटील यांचे नाव समाजात आदराने घेतले जाते, या संवेदनशील पोलिस अधिकाऱ्याची बदली मेहकर शहरातून खामगांव शहरात झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर लिहण्यासाठी किंवा बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांचं कार्यकर्तृत्व शब्दात न मावणार असल्याने अंतररंगातील हृदयस्पर्शी भाव आणि त्या शब्दांतील प्रत्ययकारी जिव्हाळा मात्र, कधीच लपत नाही. किती ही लपविण्याचा प्रयत्न केला तरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा अंतररंगातून आविष्कृत झाल्याशिवाय राहत नाही. कारण, “ज्याप्रमाणे हरणाच्या पोटात दुर्मीळ कस्तुरी असते पण त्या हरणाला माहिती नसते की आल्याकडे कस्तुरी आहे. अगदी त्याचप्रमाणे साहेबांकडं एक कस्तुरी आहे. पण त्यांना ती जाणवत नसलीतरी तिचा सुगंध दूरवर पसरलेला असल्याने त्या गंधानेच मीच नाही तर अनेकजण प्रेरित झालेले आहेत. मेहकर पोलिस विभागात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून प्रदीप पाटील यांचे कार्यकर्तृत्व उल्लेखनीय असून सत्याचे रक्षण आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी कर्तव्य तत्पर असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केले आहेत. एवढेच नव्हे, तर सर्वसामान्य माणसांच्या मनात त्यांनी आपल्या कर्तव्याचा चैतन्यमय गोडवा निर्माण करुन, समता, सलोखा, आस्था, आणि सकारात्मक विचाराची पेरणी केली आहे. त्यामुळे आदरणीय प्रदीप पाटील साहेब यांची मेहकर शहरातून बदली झाली हे मनाला पटत किंवा रुचत नाहीय. पण, साहेबांची खरचं बदली झाली त्यामुळे त्यांच्या सृजनशील व्यक्तिमत्ववार लेखणीतील कोणत्या शब्दांचा फुलोरा करुन फुलवावा हेच शब्दांनाही कोड पडले आहे. तसं मी ‘वादळातील दीपस्तंभ’ या मौल्यवान ग्रंथामध्ये माझ्या सिद्धहस्त लेखणीतून त्यांचा प्रेरक प्रवास इतिहासाच्या सुवर्णपानात फुलविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कायमस्वरुपी तेवत ठेवला आहे. शासकीय नोकरी म्हटलं की बदली आलीच, त्यामुळे हिंगोली, नांदेड, धर्मदाबाद, खामगांव, पांढरकवडा, यवतमाळ आणि आता मेहकर मधून परत खामगांव शहरात साहेबांची बदली झाली आहे. मात्र, शासनसेवा बजावत असताना साहेबांची प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी कशी कर्तव्यनिष्ठेने बहरलेली पाहण्यास मिळाली हे उल्लेखनीय आहे. साहेबांच्या वागण्यात शालीनता, बोलण्यात माधुर्य आणि नजरेत सज्जनांच्या रक्षणासाठी ममता भरलेली आहे. त्यामुळे साहेबांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन गंभीर गुन्हांमध्ये घट घडवून उत्कृष्ट कामगिरी करुन मानवतेची सेवा करीत आहेत. गुन्हेगारांच्या मुचक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. त्या-त्या शहराचा अभ्यास करुन अनेक गुन्हेगारांना तडीपार सुद्धा केले आहे. काहींना तर मोका कायद्यांतर्गत गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडलं आहे. एवढेच नव्हे तर समाजात तणावाची परिस्थिति उद्धभवली असताना जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले, शांतता राखली. त्यामुळे प्रदीप पाटील हे नाव कानावर पडताच गुन्हेगारांच्या उरात धडकी भरते. आता तर मेहकर सारख्या शहरात डीवायएसपी पदाला साजेशी कामगिरी पाहुन अनेकजण त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव करतात. साहेबांची उत्तोमोत्तम कामगिरी पाहुन याठिकाणी सज्जनाच्या बागेत तर चैतन्याचा मळाच फुललेला दिसून येतोय आणि दुर्जनांची बाग वाळलेली दिसून येत आहे. त्यामुळे अशा जिगरबाज, डॅशिंग आणि तितकेच वर्दीत दडलेले संवेदनशील उपविभागीय पोलिस अधिकारी कोणावर अन्याय होणार नाही आणि खरा गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्ये अनेकांना भावते. म्हणूनच साहेबांच्या सहवासात आलेल्याच्यां मनावर त्यांच्या विषयी प्रत्येकाच्या मना-मनात आपुलकी, जिव्हाळ्याचा ओलावा तयार होतोय. साहेब एक निष्णात व कर्तव्यनिष्ठ असून त्यांची गुणवत्तापूर्ण कामगिरी व प्रामाणिक शिस्तप्रिय पोलिस अधिकारी असा त्यांचा पोलिस विभागासह समाजात नावलौकिक आहे. त्यामुळे त्यांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा उचित गौरव व्हावा हीच अंतररंगातून हृदयस्पर्शी सदिच्छा आणि पुढील वाटचालीस भरभरुन शुभेच्छा… आणि हो, साहेब.. आपणास आली आठवण तर एकवेळ आमचीही फोन करुन विचारपुस करावी हीच मनोकामना इच्छा..आपला एक ||जिव्हाळा…|| साहेब…सदोदित आपल्या भेटीचा योगायोग येत राहावा, हीच श्रीचरणी प्रार्थना… आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पुन्हा एकदा श्रीचरणी प्रार्थना…
✒️ संतोष अवसरमोल (पत्रकार)
मु.पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो:- 9689777129



