राजकारण

जयचंद बाटीया ; आपलेपणाच्या सुत्रात माणसे गुंफणारा माणूस

घाटबोरी, प्रतिनिधि

 

जयचंद बाटीया ; आपलेपणाच्या सुत्रात माणसे गुंफणारा माणूस

सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा’ या उक्तीप्रमाणे त्यांचे आचरण असल्याने केंद्रीय राज्यमंत्री ना.मा. प्रतापराव जाधव साहेबांच्या व्यक्तीमत्वाचा खास पैलू आहे. ते नेहमी माणस जोडत असतात. ते उत्कृष्ट संघटक आहेत. त्यांच्याच विचारांचा वारसा जोपासत माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर हे मेहकर-लोणार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत मेहनत करीत आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत ज्यांनी त्यांच्या विरोधात काम केले अशा व्यक्तींना त्यांनी निवडणूक संपल्यानंतर मदतच केली. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत सकारात्मक राजकारण करण्यावर त्यांचा भर राहिला. आज त्यांच्या कर्तृत्वाची लिलया अभिमानाने सांगितले जाते. या दोघांनाही आपल्या आयुष्यात ‘आधारस्तंभ’ मानून त्यांच्याच विचारांची पेरणी करीत असताना मेहकर नगरीचे माजी उपाध्यक्ष जयचंद बाटीया हे आपलेपणाच्या सुत्रात माणसे गुंफित आहेत. त्यांच्या आपलेपणाच्या धाग्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ममता, वात्सल्य, दातृत्व, करुणा, एकोपा, सलोखा अशा विविध सद्गुणांच्या गोतावळ्यात गुरफटून गेलेले आहेत. म्हणूनच आपल्या मनमिळाऊ सहजस्वभावाने त्यांनी लोकांच्या मनात घर केले. लोकंही त्यांना आपल्या परिवारातील एक सदस्यच मानून त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात. आणि जयाभाऊ त्यांना कधी नाराज करत नाहीत. त्यामुळेच आज मेहकर नगरीचे आणि जयाभाऊच एक आगळंवेगळं जिव्हाळाचं नातं निर्माण झालं आहे. समाजातील गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा यासाठी सातत्याने जयाभाऊची तळमळ आणि सामाजिक बांधिलकी जोपासत परोपकाराची त्यांची भावना खरोखरच अतुलनीय आहे. जयाभाऊच्या बाबतीत एखाद्ये उदाहरण द्यायचे म्हटले तर, मागील काळात सुलतानपूर गावाजवळ रात्रीच्या वेळी दोन लक्झऱ्याच्या फार मोठा अपघात होऊन दोन्ही लक्झऱ्याना आग लागून जळून भस्म झाल्या होत्या. त्यावेळी त्या लक्झरीत अनेक प्रवाशांचे प्राण गेले, प्रवासी जळून खाक झाले होते. ही वार्ता रात्री सव्वातीन वाजता जयचंद बाटीया यांच्या कानावर पडताक्षणी जयाभाऊ आपल्या सोंगाड्यांना सोबत घेवून तेथे पोहोचले तेव्हा समोरील ते भयानक दृश्य पाहुन काळजाचा थरकाप उडालेला होता. समोर भयानक रुद्ररुप धारण केलेली आग आणि प्रवाशांचा अक्राळविक्राळ किंचाळ्या, त्यांचा मृत्यू तांडव पाहुन त्या प्रवाशांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते, त्यावेळी जयाभाऊ आणि त्यांच्या सोंगाड्यानी आपला जीव मुठीत धरून ती आग विझविण्याचा सर्वातोपरी प्रयत्न केला. तरीही अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. पण काही प्रवाशांचा जीव वाचविण्यात थोडे फार यश आले होते, त्यावेळी त्यांना मायेचा आधार दिला. या गोष्टीचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. म्हणून जयाभाऊचे धाडस, धैर्य, आणि दयाळूवृत्ती, हे भाऊच्या कार्यकर्तृत्वाबद्ल उत्तम उदाहरण देता येईलही. तसेच लोकनेते स्व.संजयभाऊ जाधव यांच्या सोबत जयाभाऊ मेहकर नगरपरिषदेमध्ये उपाध्यक्ष या पदावर असताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन शहरातील अनेक विकासकामे केलेली आहेत हे सर्वसुत आहे. प्रत्येक प्रभागात विकासात्मक कामे झाली पाहिजेत यासाठी जयाभाऊनी प्रशासनाच्या मदतीने शहराचा चेहरामोहरा बदलला हे एक विशेष उदाहरण देता येईल. शिंदे शिवसेना पक्षात काम करीत असताना जयाभाऊची नाळ प्रत्येक माणसासोबत जुळलेली असल्याने जयाभाऊ प्रत्येकांच्या सुखदुःखात सहभागी प्रत्येकाला आधार देण्याचे काम करीत आहेत. मग, पोलीस स्टेशनमधील कोणाची तक्रार असो की तहसील कार्यालयात कोणत्याही कागदपत्रांची समस्या असो, एक कॉल जयाभाऊला लावला म्हणजे जयाभाऊ तेथे हजर… मग त्या समस्या कोणत्याही जाती-धर्माच्या माणसांच्या असो, त्याला न्याय मिळालाच पाहिजेत याच भावनेतून जयचंद बाटीया यांचे कार्यकर्तृत्व देखणं नेत्रदीप आहे. त्यामुळे माणूस ओळखण्याची आणि माणसाला जोडून ठेवण्याची किमया जयचंद बाटीया यांच्याकडे अंगीकृत आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयात आलेल्या माणसाला मदतीचा हात पुढे करून गोरगरीब, निराधार, अनाथांना सदोदीत मायेचा आधार देण्याचे काम जयाभाऊ करीत असतात. त्यामुळे गोरगरीबांचा आधारवड वाटणारा असा हा माणूस समाजाची निष्ठेने सेवा करीत आहे. म्हणूनच जयचंद बाटीया यांच्याकडे आपलेपणाच्या सुत्रात माणसे गुंफणारा माणूस म्हणून जनसामान्यांत लौकिक प्रतिमा आहे.
_________________________

जयाभाऊ लोकांच्या दिर्घायुष्यासाठी देवाकडे करतात प्रार्थना…

आज समाजात प्रत्येक माणसांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पण बहुतांश लोकांना धकाधकीच्या जीवनात त्यांच्या वाढदिवसाच्या आठवणीची भूरळ पडलेली असते. पण, जयचंद बाटीया यांच्याकडे प्रत्येक जातीधर्माच्या लोकांच्या वाढदिवसाची नोंद असल्याने त्यांचे वाढदिवस कधी आहेत ते जयाभाऊच्या मोबाईलवरच्या टेट्सवरुन अनेकांना पाहायला मिळते आणि माहिती होते. त्यावेळी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सुध्दा जयाभाऊचे टेट्स एकदम आश्चर्याचा सुखद धक्का देत असतो. सातत्याने जयाभाऊ प्रत्येकांच्यासाठी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी, सुखी, आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जयाभाऊ विश्वनिर्मात्यांच्या चरणी प्रार्थना करीत असतात हे एक त्यांचे अनमोल कार्य विशेष आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका