
वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा अभिमान : मोहनराव धोटे पाटील
वारकरी सेवा म्हणून वारकऱ्यांना टाळ साहित्य वाटप
अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी… वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. जातीभेद विरहित मानवतेची शिकवणीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायात अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. संतांच मन हे आईच्या मनासारखं असतं. त्यांच्या विषयी काठोकाठ ममत्व भरलेलं असतं. या संतांनी वेगवेगळ्या कालावधीत जन्म घेऊन तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीत लोकांना प्रबोधन केले.
ज्ञानदेव रचिला पाया… तुका झालासे कळस. भागवत धर्माच्या उत्तुंग आणि गगनचुंबी मंदिराच्या कलशस्थांनी संत तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचे यशोशिखर आहे. असे प्रतिपादन अंबिका महिला अर्बनचे अध्यक्ष तथा जानेफळ सर्कलचे, शिंदे शिवसेना गटाचे मोहनराव धोटे पाटील यांनी वारकरी संप्रदायांची सेवा म्हणून टाळ साहित्य वाटप करतानी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, यापुढे बोलताना मोहनराव धोटे पाटील म्हणाले की, श्री. संत तुकाराम हा सांस्कृतिक टेहाळणीसाठी, साहित्यिकांसाठी, विचारवंतासाठी, शैक्षणिक वाटचालीसाठी किंबहुना प्रत्येकांसाठी मोक्याचा बुरुज आहे. हे खरे असले तरी हा बुरुज केवळ मराठी संस्कृतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तुकोबांनी अवघे आकाश कवेत घेतले आहे. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात ते चैतन्य निर्माण करु शकतात. त्यांच्या विचारांनी एक उर्जा तयार होऊन जीवनात प्रेरणादायी संजिवनी मिळते. आज महाराष्ट्राला आध्यात्मिक वारकरी परंपरा मोठी आहे. तर वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्त्व आहे. त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात. श्री, संत गजानन महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी चाललेल्या श्री संत गजानन महाराज वारकरी मंडळ जानेफळ, या पायी दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. दिंडीतील वारकऱ्यांची सेवा, एक सामाजिक दायित्व म्हणून या वारकऱ्यांना टाळ साहित्य वाटप केले आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा अभिमान आहे. असे बोलताना, मेहकर तालुक्यातील जानेफळ सर्कलचे मोहनराव धोटे पाटील यांनी सांगितले. श्री संत गजानन महाराज वारकरी मंडळ जानेफळ हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या निस्सीम भक्तीभावानी शेगांव ते पंढरपुर अशा पायदळ वारी करीत श्री. संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पायी वारीत वारकरी चालले होते. त्यावेळी एक सेवा म्हणून जानेफळ सर्कलचे तथा अंबिका महिला अर्बनचे अध्यक्ष मोहनराव धोटे पाटील व सामाजिक कार्यकर्ते डॉ. कृष्णा हावरे यांनी पायी दिंडी वारकऱ्यांना जानेफळ येथील अंबिका माता मंदिराच्या टेकडीवर सामाजिक दायित्व म्हणून सेवा केली आणि वारकऱ्यांना अत्यंत दर्जेदार टाळ साहित्य वाटप करुन वारकरी मंडळाचे मोठ्या भाविकभक्तांनीही शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जानेफळ सर्कलमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जानेफळ गावातील अनेक गावकरी आणि पंचक्रोशीतील सर्कलमधील असंख्य नागरिक तन-मन-धनानी सामाजिक कार्यकर्ते मोहनराव धोटे पाटील व सामाजिक कार्यकर्ते डॉ. कृष्णा हावरे यांच्यावर नितांत प्रेम, आपुलकी, आस्था असणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी पूढे बोलताना मोहनराव धोटे पाटील म्हणाले की, सुरवातीपासून समाजसेवा करीत आलो आहे. पण समाजसेवा करीत असताना प्रसिद्ध पासुन दूरच राहिलेला असलोतरी मला सर्व सामान्य माणसांची सेवा करण्याची आवड आहे. आणि पूढील काळात देखील, मला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त होवो, हीच प्रार्थना करतो असे प्रतिपादन जानेफळ सर्कलमधील अंबिका महिला अर्बनचे अध्यक्ष तथा शिंदे शिवसेना गटाचे मोहनराव धोटे पाटील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
————————————————–
वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा ; डॉ कृष्णा हावरे
समाजाचे आपणास काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे. या सामाजिक जाणिवेतून समाजात अनेकजण कार्यरत आहेत. पण, अंबिका महिला अर्बनचे अध्यक्ष मोहनराव धोटे पाटील हे प्रसिद्धपासून दुर असलेतरी त्यांचे सामाजिक दायीत्व मोठ्या प्रमाणात आहे. एका हातीनी केलेली मदत दुसल्या हाताला कधीही न कळू देता, आपल्या कष्टाच्या मेहनतीमधील काही अंशः दातृत्व म्हणून सढळ ओंजळीतून मदत करीत असतात. त्यांची सेवाभावी वृत्ती खरोखर उल्लेखनीय आहे. त्यांच्याकडून वारकऱ्यांची सेवा घडत आहे, वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. त्यामुळे मोहनराव धोटे पाटील यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. असे सामाजिक कार्यकर्ते डॉ कृष्णा हावरे यांनी बोलताना सांगितले.


