गंगासागर वानखेडे यांच्या माणुसकीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले गोड हास्य !
घाटबोरी, प्रतिनिधी
गंगासागर वानखेडे यांच्या माणुसकीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले गोड हास्य !
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गोरगरीब, वंचित घटकांतील कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी याचं उदात्त हेतूने पत्रकार संतोष अवसरमोल यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून, घाटबोरी येथील रहिवासी आणि मुंबईमध्ये वास्तवास असलेले एक सज्जनशील उद्योगपती, गंगासागर आनंदा वानखेडे यांनी घाटबोरी गावातीलच पारधी वाड्यावर व अनुचित जमातीच्या वस्तीतील लहान-लहान चिमुकल्या बालकांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उपस्थित असलेल्या चिमुकल्या बालकांच्या चेहऱ्यावर उमलेले हसू पाहून गंगासागर वानखेडे व त्यांच्या कुटुंबातील मुलगा अक्षय, मुलगी शुभांगी, सुनबाई अश्विनी यांनी चिमुकल्यांच्या हास्यमध्ये समाधान व्यक्त करीत आपली दिवाळी आनंदमय साजरी केली. यावेळी गंगासागर वानखेडे बोलताना म्हणाले की, वंचित घटकांतील चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य, हा आनंद घरच्या दिवाळीपेक्षाही अधिक उत्साहापूर्ण दीपोत्सवाचा प्रकाश तेजोमय झाला असे वानखेडे यांनी सांगितले. यावेळी घाटबोरी गावचे सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार, पत्रकार संतोष अवसरमोल, सामाजिक कार्यकर्ते गजानन धामनकर, माजी सरपंच विजूपाटील नवले, सामाजिक कार्यकर्ते शेषराव अंभोरे, दिनकर अंभोरे, अक्षय गंगासागर वानखेडे, शुभांगी गंगासागर वानखेडे, अश्विनी अक्षय वानखेडे, रामु कुसळकर, तुकाराम अण्णा कुसळकर, यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
———————————————–
गंगासागर वानखेडे यांचा सुत्य उपक्रम : गजानन चनेवार ( मा.सरपंच )
दीपावलीचा सण हा आनंद व चैतन्य देणारा असतो. यासाठी आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे लागतो. शिवाय आपल्या आनंदातील काही क्षण इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणं यासारख दुसरं सुख नाही. याचं उदार मनाने गंगासागर वानखेडे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला त्यामुळे चिमुकल्या बालकांना दिवाळीचा आनंद अधिक लुटता आला. या उपक्रमामुळे चिमुकल्या बालकांचे हास्य मंगलमय, आनंददायी आणि मनात नवं चैतन्य निर्माण झाल्याचे समाधान वाटले, यापुढे सगळ्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपुया, अशा भावना माजी सरपंच गजानन चनेवार यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.



