मोहनराव धोटे यांनी वृद्धाश्रमात निराधार वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले
घाटबोरी, प्रतिनिधी
अक्षरशः वयोवृद्ध निराधार आजी-आजोबा ढसढसा रडू लागली!
मोहनराव धोटे यांनी वृद्धाश्रमात निराधार वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले
|| ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’ ||
ही उक्ती ज्यांच्या नसानसात भिनलेली आहे. ज्यांचं मन नेहमीच हळवं होत असते, अशा जानेफळ सर्कल मधील शिंदे शिवसेना गटाचे तथा अंबिका महिला अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव धोटे यांनी परोपकाराची सामाजिक बांधिलकी जोपासत, त्या थरथरत्या काठीचा आधार होऊन वृद्धाश्रमातील वयोवृद्ध निराधार आजी-आजोबांची दिवाळी साजरी केली आहे. ‘ज्या जन्मदात्यांनी आयुष्य दिले, जीवन तेजोमय केले, त्यांनाच काही महाशय विसरले आहेत. त्यामुळे ते निराधार झालेले वयोवृद्ध वृद्धाश्रमात राहिलेले आयुष्य जगत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रुपाने त्यांना मिणमिणत्या पणतीचे दर्शन घडतं नाही. त्यांच्या आयुष्यात शेवटी दिवाळी कसली साजरी होणार. याचं विवेचनेतून सामाजिक कार्यकर्ते मोहनराव धोटे यांनी त्या वयोवृद्ध निराधार आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मेहकर येथील स्व. अरविंद उमाळकर वृद्धाश्रम येथे त्यांच्यासोबत मिठाई, फरसाण, बिस्किटे वाटप करुन दिवाळीचा उत्सव साजरा केला. त्यावेळी उपस्थितांचे मनेही गहिवरुन आले होते. ना कुणी जन्मोजन्माचे सोबती, ना कुणी रक्ताच्या नात्याचे. केवळ एकत्र राहुन वृद्धाश्रमात वृद्धांची जुळलेली नाती. त्या जुळलेल्या नात्याला आपलेसे माणून त्यांच्यावर प्रेम, आपुलकी आणि आत्मियेतेच्या कळवळानी मोहनराव धोटे यांनी वृद्धाश्रमात वृद्धांच्यासोबत दिवाळी साजरी करीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. साहेब आमच्या मुलांनी आम्हाला घराच्या बाहेर काढले हो..पण वृद्धाश्रमात हेच आमचे घर असून त्या मुलांपेक्षाही चांगली व्यवस्था येथे घेतली जाते. आमच्यासाठी स्व. अरविंद उमाळकर वृद्धाश्रम मायबाप असून साक्षात भगवान आहे असे म्हणून अक्षरशः वयोवृद्ध निराधार आजी-आजोबा ढसढसा रडू लागलेले होते. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते मोहनराव धोटे यांच्यासह डॉ. कृष्णा हावरे, उमेशराव सदावर्ते, संजय सराफ, प्रभाकरराव आवारे, श्री. इंगोले या सर्वांचे आजी-आजोबांकडे पाहुन डोळे पाणावले होते. त्यामुळे खरोखरच मोहनराव धोटे यांनी माणुसकीचे दर्शन घडविल्यामुळे यांचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
———————————-
मोहनराव धोटे यांच्या दातृत्वाच्या ओंजळी सदोदीत पुढेच…
महाभारतातील कर्ण हा दानशूर असल्याचे अनेक दाखले दिले जातात. आजच्या काळात समाजात अनेक दानशूर माणसेही आहेत. त्याचं विचारांनी प्रवाहित होऊन, आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणं लागतो या सहृदयहेतूने, जानेफळ सर्कल मधील अंबिका महिला अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव धोटे यांचे देणारे हात असल्याने त्यांच्या ओंजळी सदोदीत पुढेच दिसून येत असतात. सतत सामाजिक बांधिलकी जोपासत, त्यांनी वृद्धाश्रमात निराधार वृद्धांची सेवा केली. मोहनराव धोटे सातत्याने रंजल्या गांजल्यांची सेवा करीत असताना, एका हाताने केलेल्या दानाची दुसऱ्या हाताला कधी कळू देत नाहीत. दानाची वाच्यता होऊ देत नाहीत. विशेष म्हणजे प्रत्येकांच्या सुखदुःखात समरस होऊन एकात्मतेने आपुलकी, जिव्हाळ्याचे नाते जोपासतात. ‘बोले तैसा चाले’ या पाऊलवाटेवर सामाजिक कार्यकर्ते मोहनराव धोटे मार्गक्रमण करीत गरजवंताच्या चेहऱ्यावर सदोदीत हास्य फुलवित असतात.
डॉ. कृष्णा हावरे
सामाजिक कार्यकर्ते जानेफळ
—————————————-
निराधार व वयोवृद्ध नागरिकांना आधार देणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. एक पणती लावून आपण त्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकु शकतो. अनेक वर्षांपासून अशा प्रकारे दिवाळी साजरी करत असताना जे आत्मिक समाधान मिळतं, ते शब्दात मांडणे कठीण आहे. आज समाजात अनेक समस्या आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासने ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे युवा पिढीने अशा उपक्रमांत सहभागी घ्यावा हाच खरा परिवर्तनाचा मार्ग आहे. असे जानेफळ सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव धोटे यांनी यावेळी सांगितले.



