
रवीराज रहाटे; जनतेच्या मनातील कार्यकर्त्यांनी जपलेला माणूस
ऊॅचाइयॉ पर बैठना आसान है, पर जमीन पर उतरकर लोगों के लिए जीना यही असली जिंदगी है
या ओळी ज्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने लागू पडतात ते केंद्रीय राज्यमंत्री ना.मा. प्रतापराव जाधव साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सेवेशी. राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करीत असताना विकासाचा डोंगर उभा करण्याची ज्यांनी किमया साधली, यातून सर्वसामान्य जनतेची सेवा करीत असताना त्यांच्या मनात आदरभाव निर्माण केला असे प्रगल्भ, अभ्यासू, दूरदृष्टी नेतृत्व म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात भाऊंची ओळख. भाऊंच्या आशीर्वादामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण करुन, मेहकर मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करु शकणारे गतिमान नेतृत्व म्हणजे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्याकडे पाहिले जाते. भाऊ आणि डॉक्टर साहेब यांच्या संस्काराचा वसा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि मेहकर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अहोरात्र झटण्याची तयारी ठेवलेले निष्ठावंत शिवसैनिक रवीराज रहाटे हे आपल्या हातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे मिटतील यासाठी धडपडत आहेत. स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण इतरांसाठी जगावे, इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी मुक्तपणे त्यांच्या सहवासात राहावे याची पुरेपूर जाण रवीराज रहाटे यांना असल्याने त्यांनी जमिनीवर पाय ठेवून समाजाची सेवा करीत आहेत. रवीभाऊ रहाटे म्हणजे सर्वसमावेशक विचारसरणी असून लोहचुंबकासारखे व्यक्तिमत्व आहे . राजकारणात, सामाजिक जीवनात काम करताना सर्वांना सांभाळून घेणे, मदतीला, अडीअडचणींना धावून जाणे हा रवीभाऊंचा अत्यंत महत्वाचा पैलू. राजकारणापलीकडे जाऊन मदत मागणाऱ्याला मनापासून मदत करणे हा रवीभाऊचा स्थायीभाव. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे सर्वसमावेशक वृत्ती, याचं गुणवैशिष्ट्यामुळे कार्यकर्त्यांनी जपलेला आणि जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस असलेला रवीभाऊ रहाटे यांच्याकडे मेहकर नगरीचा उद्याचा ‘भावी’ नगराध्यक्ष म्हणून पाहिले जाते. रवीभाऊ रहाटे यांचा राजकीय प्रवास हा सत्तेच्या गोंगाटाचा नव्हे तर सेवेच्या शांत निर्धाराचा आहे. वाद वाढवण्यापेक्षा संवाद साधणं, प्रतिस्पर्ध्याला हरवण्यापेक्षा त्याला समजून घेणं आणि विरोधाकांनाही आदर देत आपला मार्ग ठामपणे चालत राहणं हीच त्यांची सेवाभावी नेतृत्वशैली. राजकारणात शांतता, संयम आणि आत्मचिंतन यांची जोड लाभलेली अशी माणसं दुर्मीळच. रविभाऊच्या बोलण्यात गोडवा पण विचारात ठामपणा आहे. ते न बोलता, कृतीतून लोकांच्या मनाशी संवाद साधतात. यामुळेच जनतेच्या प्रत्येक माणसांसोबत त्यांच आज एक भावनिक नातं तयार झालं आहे. उच्च विद्याविभूषीत असून त्यांची खरी नाळ येथील प्रत्येक मनाच्या काळ्या मातीशी जोडली आहे. त्यामुळे त्यांचा अभिमान कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरतो.
—————————————————————-
रवीभाऊ रहाटे यांचा परिवार म्हणजे गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य वंचितांच्या सुखदुःखात सहभागी होऊन, सर्वांच्या मदतीला धावून, मोठ्या आपुलकीच्या भावनेने त्यांच्या जीवनात आनंदाचा झरा निर्माण करणारा हा रहाटे परिवार आहे. त्याचं रहाटे परिवाराच्या सुसंस्कृत संस्कारांची शिदोरी घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून रवीभाऊ रहाटे हा माणूस गोरगरीब, जनता-जनार्धन मायबापाची सेवा करीत आहे. राजकारणापेक्षा त्यांना समाजसेवेत जास्त रस आहे म्हणूनच मेहकर शहरातील जनता-जनार्धन रवीभाऊ रहाटे यांच्या पाठीशी उभे राहतात, नेहमीच भरभरून आशीर्वाद देत असतात. आताही नगरपालिकेचे पडघम वाजायला सुरुवात झाली म्हणून मेहकर शहरातील जनता-जनार्धनाच्या आग्रहावास्तव रवीभाऊ रहाटे हे जनतेची सेवा करण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीला सामोरे जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री ना. मा. प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार डॉ संजय रायमुलकर या दोघांचा आशीर्वाद रवीभाऊला मिळेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



