राजकारण

विलास चनखोरे मतदारांच्या गाठीभेटीसाठी घरोघरी ; जनतेतून मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद!

घाटबोरी, प्रतिनिधी

‘एकच वादा, विलास दादा’..‌.जनतेचा निर्धार !

विलास चनखोरे मतदारांच्या गाठीभेटीसाठी घरोघरी ; जनतेतून मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद!

मेहकर नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी वेग घेऊ लागली असून विविध प्रभागांमध्ये कॉग्रेसपक्षाचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे असून त्यांची मतदारांच्या सोबत सकारात्मक गाठीभेटी, संवाद चर्चा होत असून त्यांना मेहकर शहरातील नागरिकांकडून भरभरून आशीर्वाद मिळत आहे. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता आता पर्यंत शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि नेहमी संपर्कात असणारा हक्काचा माणूस म्हणून माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांची ओळख आहे. चनखोरे यांची परोपकारी भावना असून ते नेहमी समाजहितासाठी तळमळीने पुढे येऊन सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचे काम करीत असतात. स्वतःची सुखदुःखे विसरून ते सातत्याने जनतेच्या हितासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर गर्दीत हरवलेले असतात. त्यामुळेच मेहकर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विलासजी चनखोरे हाच एकमेव पर्याय असून आता आगामी निवडणुकीत ‘एकच वादा, विलास दादा’ असा ठाम निर्णय मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान विलासजी चनखोरे यांना विश्वास मिळत आहे. प्रत्येक घरोघरी जनतेतून साथ… माय-माऊलींचा आशीर्वाद… विलास चनखोरे यांच्या विजयाचा शंखनाद….! अशी चर्चा सर्वत्र शहरातील प्रभागांमध्ये होत आहे. जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांनी आजवर कोणत्याही गट-तट न पाहता प्रत्येकांच्या समस्या सोडविण्यात, त्या समस्यांचे निराकरण करण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांचे बोलणे गोड, वागणं मायाळू, अंतःकरण दयाळू. स्वभावातच अत्यंत मधाळपणा असल्यामुळे सर्वांनाच ते सतत हवेहवेसे वाटतात. लोकहितार्थ निर्णय, विकासाभिमुख कारभार, पक्षासाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे नितळ प्रतिमा म्हणून नावलौकिक त्यांनी मिळवलेला आहे. कोणतेही अपेक्षा न ठेवता त्यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. याचं जनतेच्या आशीर्वादाने विलासजी चनखोरे मेहकर नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसपक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या अनुषंगाने विलासजी चनखोरे मेहकर शहरातील प्रत्येक प्रभागात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. या दरम्यान जनतेतून त्यांना वाढता प्रतिसाद आणि भरभरुन आशीर्वाद मिळत आहे.

——————————————————–

माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे हे कॉग्रेसपक्षाचे संभाव्य उमेदवार असल्यामुळे त्यांचा जनसंवाद मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान शहरातील विविध प्रभागांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विलास चनखोरे एक चांगला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस आहे. त्यामुळे आता कोणी काहीही आमिष दाखवले तरी त्यांच्या त्या भूलथापांना बळी पडायचे नाही, आपण एकसाथ, एकदिलाने विलास चनखोरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि राहणार असा निर्धार जनतेतून होत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान गाठीभेटी संवाद चर्चा होत असताना माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे, नारायण पचेरवाल, रामेश्वर पिटकर, गजानन लादे, उस्मान भाई, अलियान भाई, मुनाफ भाई, जमिल भाई, अहमद भाई यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, सोबत असतात त्यावेळी जनता-जनार्दनही त्यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका