राजकारण

कॉग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष ; लक्ष्मनदादा घुमरे 

घाटबोरी, प्रतिनिधी

 

कॉग्रेस हा जनतेच्या मनातील पक्ष ; लक्ष्मनदादा घुमरे 

कासमभाई गवळी आणि सौ. मीराताई भूषण मापारी यांना विजयी करण्याचे आवाहन

 

कॉग्रेसपक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मनदादा घुमरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कासमभाई गवळी आणि सौ. मीराताई भूषण मापारी यांच्या उमेदवारीला अधिकृतपणे समर्थन असून मेहकर आणि लोणार शहराच्या नगरपरिषद निवडणूकीत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. यापुढे लक्ष्मनदादा घुमरे म्हणाले की, कॉग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. मेहकर -लोणार शहरातील कॉग्रेस पक्षाचे उमेदवारांचे कार्य आणि योगदान जनतेच्या हितासाठी नेहमीच प्रगल्भ ठरले आहे. मेहकर नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसपक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार कासमभाई गवळी आणि लोणार शहरातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या कॉग्रेसपक्षाच्या उमेदवार सौ. मीराताई भूषण मापारी या दोन्ही उमेदवार केवळ राजकारणी नाहीत, तर जनतेच्या हितासाठी कटिबध्द असलेले एक समाजसेवक आहेत, यांचे कार्यकर्तृत्व समाजाच्या वंचित घटकांसाठी, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि समतेच्या विचारधारेच्या विकासासाठी समर्पित आहे. ते सातत्याने समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्कासाठी त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे मेहकर शहरातील कासमभाई गवळी आणि लोणार शहरातील सौ. मीराताई भूषण मापारी यांच्यासह प्रभागातील सर्व कॉग्रेस उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व जनतेला आवाहन महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मनदादा घुमरे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पुढे लक्ष्मनदादा घुमरे म्हणाले की, काँग्रेसचे उमेदवार हे एक विश्वासार्ह आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या भल्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची उमेदवारी चळवळीला बळ देणारी आणि समाजहितासाठी समस्यांचे निराकरण करण्यासाठी असून ते समाजातील विविध जाती धर्म आणि वर्गांमध्ये एकता निर्माण करणार आहेत. त्यांनी याअगोदर समाजहितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे मेहकर शहरातील कासमभाई गवळी आणि लोणार शहरातील सौ मीराताई भूषण मापारी यांचे कार्यकर्तृत्व समाजहित जोपासणारे असल्याने दोन्ही तालुक्यातील जनतेला आवाहन करतोय की, कॉग्रेसपक्षाच्या ‘पंजा’ या निशाणीवर शिक्का मारा आणि कासमभाई गवळी आणि सौ. मीराताई भूषण मापारी यांना भरघोस मतांनी विजयी करावे म्हणजे एक नवा प्रारंभ आणि जनतेच्या हितासाठी सच्चा उमेदवारांचा विजय होईल आणि विकासाला गती येईल असे महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मनदादा घुमरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

——————————————-

जनतेवर विश्वास

लक्ष्मनदादा घुमरे यांचे मत आहे की, कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते केवळ सत्तेसाठी काम करत नाहीत, तर समाजाच्या सर्व स्तरांवर असलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असतात. कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी काम करत असतो, आणि त्याचे कार्य केवळ निवडणुकीसाठी नसून समाजात एक सकारात्मक बदल घडविण्यासाठी असतो. त्यांचे म्हणणे आहे की, कॉग्रेसचे कार्यकर्ते आणि जनतेतील नाळ मजबुत आहे. या दोन्ही उमेदवारांबद्दल बोलताना लक्ष्मनदादा घुमरे म्हणाले,”ही निवडणूक सामाजिक न्याय, समानता, आणि लोकहिताची निवडणूक आहे. आम्हाला विश्वास आहे की, कासमभाई गवळी आणि सौ. मीराताई मापारी यांना जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि दोन्ही उमेदवार विजयी होणार आहेत.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका