
खचलेल्या मनाला उभारी देणारी; अॅड. माधुरी पवार
खचलेल्या मनाला उभारी देणारे शब्द, अडचणीत मदत करणारे हात आणि दुःखात सांत्वन करणारी माणसं कधीही विसरता येत नाहीत. कारण, त्याच्या अंतःकरणात कुठेतरी एक हळवा कोपरा असतो जिथे तो फक्त ‘दुसऱ्यांसाठी’ जगण्याचा विचार करतो. हीच खरी त्याच्या जीवनात समाजसेवेची तहान असते. याचं उद्दारतेने राजकारणात राहुनही समाजसेवेच्या तहानेने व्याकूळ झालेला, सामाजिक बांधिलकीच्या वाटेवर चालणारा मेहकर तालुक्यातील जानेफळ जि.प. सर्कलमधील कॉग्रेसपक्षाचा निष्ठावंत शिलेदार देवानंद पवार शिस्तीच्या झाडासारखा मोहोरतं आहे. अशा सावली देणाऱ्या वृक्षाना आणि आधार देणाऱ्या माणसांना तर विसरतो म्हटले तरी विसरता येत नाही. अशा व्यक्तीचा जन्मच मुळी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत इतरांचे दुःख कमी करुन त्यांना आनंद देण्याकरिता झालेला असतो. अशी माणसं आयुष्यभर एखाद्या वृक्षाप्रमाणे गरजूंना आधाराची सावली देत असतात. त्यामुळे आयुष्यात खचलेल्या, पिचलेल्या माणसांना बळ देणारा हा देवानंद पवार सारखा माणूस प्रत्येकाला त्यांचे नेतृत्व आपलेसे वाटते. राजकारणापलीकडे जावून मैत्री जपणारा आणि सर्वांना मायेची पांघरूण घालणारा हा देवानंद पवार विरोधकांतही नेहमीच आदरयुक्त चर्चेचा विषय राहिला आहे. जमिनीवर पाय असणाऱ्या या नेतृत्वाने सामान्य माणसाला कायम मोठा दिलासा दिला आहे. सर्वधर्मसमभावाची वागणूक, नेतृत्वगुण, दूरदृष्टी, काटकसर, आध्यात्मिकता असा सर्वगुणसंपन्न परोपकारी संस्कृतीने पवार परिवार मोहरलेला आहे. याचं सुसंस्कृत, मायाळू परिवारातील देवानंद पवारांची लाडकी लेक अॅड माधुरी देवानंद पवार हाताला समाजसेवेचे कंगण बांधून समाजाच्या सुखदुःखाशी समरस होऊन निष्काम दातृत्वाची सेवाव्रती झालेली आहे. समाजसेवा हीच देवपूजा असे मानून जीवन जगणाऱ्या आणि स्वतःपेक्षा जास्त समाजाचा विचार करणाऱ्या व वडिलांच्या कडून समाजसेवेचा वारसा मिळालेल्या अॅड माधुरी देवानंद पवार एक प्रेरणेची ज्योत घेऊन इतरांच्या आयुष्यात ‘मायेची ऊब’ देण्यासाठी, प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य गोरगरीब, निराधारांवर मायेची सावली पांघरत त्यांना जगण्याचे, लढण्याचे बळ देत आहे. अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अॅड माधुरी पवारने स्वतःला समाजसेवेत झोकून दिले. सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्ष अॅड माधुरी देवानंद पवार कडे पाहिल्यावर तिच्या देहबोलीतून किंवा नेहमीच्या सुसंवादातून माधुरी कधीच अहंकारी वाटत नाही. कोणालाही कधी परकेही वाटत नाही. सगळ्यांना आपली लाडकी ताई, बहिण, लेक हवेहवेसे वाटणारे आदर्श व्यक्तिमत्व वाटते. राजकारणाच्या पलीकडे असणाऱ्या जनसागरांचा तळ माधुरी पवारने गाठला आहे. केवळ स्वप्नरंजनाच्या नभात तरंगणारा नव्हे तर वास्तव्याच्या भूमीवर भक्कम पाया रोवून उभा असणारा मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व खरोखरच समाजभूषण आहे. अॅड माधुरी देवानंद पवार सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहे. त्यामध्ये पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी कौटुंबिक जबाबदारी येत असते. विधवा म्हणून त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी मर्यादा लावल्या जातात. प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते. या प्रथांना फाटा देत अॅड माधुरी देवानंद पवार ने समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना हळदीकुंकवाचा मान देऊन त्यांचा सन्मान केला आहे. या उपक्रमामुळे त्या विधवा महिलांना मानसिक बळ मिळाले आहे. एवढेच नव्हे तर समाजाने नाकारलेल्या तृतीयपंथींना सोबत घेऊन माधुरी पवार ने तृतीयपंथींना हळदीकुंकू लावून, त्यांना तीळगुळ, गजरा देऊन त्यांच्यावर फुले उधळून त्यांचे औक्षण केले आहे. समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही आमच्यात सामील व्हा, या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून माधुरी पवार ने सामाजिक सलोखा वृद्धिंगत केला आहे. समाजाप्रती आपल्यालाही काहीतरी देणे लागतो याचं भावनेतून माधुरी पवारने शालेय विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना वहिपेन, नोटबुक, शैक्षणिक वाटप केले आहे आणि करीत आहे. या उपक्रमामुळे माधुरी चिमुकल्या विद्यार्थ्यांची लाडकी ताई झालेली आहे. समाजसेवेची आवड माधुरीच्या नसानसात भिनलेली आहे. गोरगरीबांची सेवा करण्याची इच्छा, तिची तळमळ असल्याने अॅड माधुरी पवारने आतापर्यंत गोरगरीब, निराधार, वंचितांच्या सेवेतच खरी ईश्वर सेवा आहे या नितळ भावनेतून नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास १० हजारांच्यावर नागरिकांच्या डोळ्याची मोफत तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आलेले आहेत. एवढेच नव्हे तर हजारो नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि हा उपक्रम आजही चालू आहे. आजचा तरुण विद्यार्थी हा उद्याचा उज्ज्वल भविष्य आहे. त्या विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वासाचा रंग भरण्यासाठी, आतापर्यंत माधुरी पवारने हजारो गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांना प्रेरणादायी पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. सोबतच पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी वृक्षतोड करु नका हा संदेश माधुरी पवारांनी दिला असून झाडे वाढवा, झाडे वाचवा या अभियानाची सुरुवात करुन परिसरात हजारो वृक्षारोपण केले आहे. तसेच सामाजिक एकोपा वृद्धींगत करण्यासाठी दरवर्षी राखी पौर्णिमेला माधुरी पवार आपल्या हजारो भावाचे औक्षण करून त्यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधून आपल्या या प्रेमाच्या भावाला दिर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून माधुरी भाग्यविधात्याकडे प्रार्थना करत असते. विशेष म्हणजे माधुरी दरवर्षी घरीच राखी बनवण्यासाठी अनेक महिलांच्या हाताला काम देऊन त्यांच्या आर्थिक समस्या सोडवित असते. समाजात वावरत असताना सर्वधर्मसमभावाची वागणूक माधुरी पवारांची असल्याने बौद्ध समाजाच्या विविध कार्यक्रमात माधुरी सहभागी होत असते. तर बंजारा समाजातील विविध पारंपरिक उत्साहात सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करीत असते. मुस्लिमसमाजातील सण-उत्सव आपलेसे समजून मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शवते. एवढेच नव्हे तर हिंदू संस्कृती परंपरेनुसार प्रत्येक उत्साहात तन्मयतेने सहभागी होत असते. वारकरी बांधवांना टाळ, मृदंग, वीणा साहित्य वाटप करुन माधुरी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होत असते. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अॅड माधुरी देवानंद पवार गोरगरीब, निराधार, वंचितांच्या सेवेतच खरी ईश्वर सेवा आहे असे समजून समाजसेवा करीत आहे. त्यामुळे आपुलकी, उद्यमशीलता आणि स्थितप्रज्ञता यांचा अनुपम संगम म्हणजे खचलेल्या मनाला उभारी देणारी माधुरी देवानंद पवार आहे.



