राजकारण

‘लोणीगवळी’चा शिलेदार; पक्षाने संधी दिल्यास अंजनी बु, जि.प. सर्कलमधून निवडणूक लढवणार!

घाटबोरी, प्रतिनिधी

               || विजय पर्व ||

‘लोणीगवळी’चा शिलेदार; पक्षाने संधी दिल्यास अंजनी बु, जि.प. सर्कलमधून निवडणूक लढवणार!

आभाळाला हात टेकत असताना, जमिनीवरती पाय भक्कमपणे घट्ट रोवून कसे ठेवावेत हे माजी सभापती केशवराव जागृत यांच्याकडून शिकण्यासारखे, वागण्यात आणि बोलण्यात शालिनीता, सात्विक, सोज्वळ मधुरता, विचारामधील स्पष्टता आणि प्रत्येक जातीधर्माच्या लोकांसोबत मायेची पखरण करणारे हे लोणीगवळी येथील ‘विजयीपर्वा’ची वात्सल्यमुर्ती आहे. जनता-जनार्दनाला वाहिलेल्या सत्कर्मरुपी सुमनांचा गंध दरवळत असल्याने त्यांचे जनमनामध्ये त्यांना विशेष आदराचे स्थान आहे.
गावाच्या मराठी मातीचा कणखरपणा आणि राजकारणातील मुत्सद्दीपणा केशवराव जागृत यांच्या रक्तात भिनलाय. म्हणून त्यांचे राजकारण जात-धर्मापलीकडे दिसते. सर्वसमावेशक वृत्ती ही त्यांची खरी पुण्याई! पण या पुण्याईवर न थांबता, केशवराव जिल्ह्याच्या राजकारणात, समाजाकारणात, सहकारात ज्या निष्ठावंत आणि प्रामाणिक नेत्यांची इतिहासाला दखल घ्यावी लागेल, त्यामध्ये केशवराव जागृत हे नाव अत्यंत सन्मानाने लिहावे लागेल. आजच्या राजकारणात निसरडेपणा आहे. आजचे राजकारण पैशाभोवती फिरत आहे. आजचे राजकारण सिद्धी ऐवजी प्रसिद्धीसाठी आहे. जाहिरातबाजीसाठी आहे. या सगळ्या अस्वच्छ राजकारणात गेली पन्नास वर्षे आपल्या पांढल्या स्वच्छ पोशाखावर एकसुद्धा डाग न पडू दिलेला राजकारणी शोधायचा तर लोणीगवळी येथील माजी सभापती केशवराव जागृत या नावाशी येऊन थांबावे लागले.
काही झाडं उंच वाढतात पण ती वाटसरुंना सावली देत नाहीत. अशोकाची झाडं अशीच सावली न देणारी असतात. या झाडाचा कुणालाही उपयोग होत नाही. याउलट वडाच्या झाडासारखी झाडं उंच वाढत नाहीत, पण ती डेरेदार होतात. सर्वांना सावली देतात. केशवराव जागृत यांना लोणीगवळीसह तालुक्यातील जनता-जनार्दन सर्वांना सावली देणारे वडाचं झाड म्हणतात. विपरीत परिस्थितीत टिकून राहणारा वटवृक्ष असतो. तसं केशवराव जागृत नेतृत्वाचं वैशिष्ट्ये आहे. केशवराव जागृत यांची शिंदे शिवसेना पक्षाशी विचारांशी बांधिलकी आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या विचारांचा राजकीय वसा घेतला आहे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून व त्यांच्या वागण्यातून सातत्याने पक्षासोबत असलेली निष्ठा प्रकर्षाने जाणवते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जनतेचा विश्वास आणि प्रेम मिळविणे ही सहजसाध्य बाब नाही. धनसंपदा मिळविणे सोपे आहे पण माणसांचे प्रेम मिळविणे व विश्वास मिळविणे सोपे काम नाही. हे अखंड तपश्चर्येचे एक सामाजिक व्रत असते. गुरुचे व्रत शिष्याने पाळावे, बापाचा समाजसेवेचा धर्म मुलाने स्वीकारावा हे सिद्ध करुन दाखवले केशवराव जागृत यांच्या परिवारात विजय केशवराव जागृत यांनी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील हा राजधर्म पाळीत आला आहे. गोरगरीब, निराधार, वंचितांच्या अपेक्षांच्या जबाबदारीची जाणीव विजय जागृत यांना आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची हातोटी आहे. विरोधकांना चीतपट करण्याची संधी असली तरी राजकारणाच्या या सार्वजनिक क्षेत्रात प्रासंगिक औचित्य लक्षात घेऊन त्यांच्याकडे कधी दुर्लक्ष्य करायचे हे जाणणारे विजय केशवराव जागृत अत्यंत प्रगल्भ निष्ठावंत शिवसैनिक आणि आदर्श शिक्षक आहेत. राजकारणात राहूनही तत्व, एकनिष्ठता व विचारधारा जपणारा हा ‘विजय पर्व’ म्हणून विजय जागृत यांची दूरवर ओळख आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकांनी पक्षाकडे पाठ फिरवली मात्र, केशवराव जागृत व विजय जागृत हे पितापुत्र पक्षाशी व पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले याचा लोणीगवळीतील समाजबांधवासह कार्यकर्त्यांना मोठा अभिमान आहे. मातीशी नाळ जोडलेली असल्याने विजय जागृत सातत्याने जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धावपळ करीत असतात.
समाजासाठी काहीतरी करावं याचं भावनेतून विजय जागृत हे दीन दुबळ्यांच्या सेवेला पुण्य समजून परस्परांप्रती दयेने, ममतेने, करुणेने सढळ हाताने मदत करीत असतात.
ज्ञानाच्या स्पर्शाने यांच्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर बहर आली तरी डोक्यात हवा न शिरु देता सेवाधर्मासाठी मिळालेले आयुष्य स्वाभिमानाने पाय जमिनीवर कायम ठेऊन आपल्या वडिलांचे विचार आणि राजकीय क्षितिजावरती असलेले आधारस्तंभ यांच्या विचारांची शिदोरी घेऊन विजय जागृत अंतःकरणापासून समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि सामाजिक कार्यामुळे विजय जागृत यांना तरुण कार्यकर्त्यांचा चाहता मैफिला आणि समाजाचा गोतावळा मोठ्या प्रमाणात सोबत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली त्याचं अनुषंगाने मेहकर तालुक्यातील अंजनी बु सर्कलमधील कार्यकर्त्यांकडून विजय जागृत यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी करीत आहेत. तसा विजय जागृत यांचे वैयक्तिक या सर्कलमध्ये जिवाभावाचे मित्र सहकारी आणि समाजाबांधव, नातेवाईक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कितीतरी मतांनी निवडून विजयी होतील. म्हणून अंजनी बु जिल्हा परिषद सर्कलमधून विजय जागृत निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आणि प्रबळ दावेदार आहेत. शिंदे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाने संधी दिल्यास येथे विजयचा ‘विजय पर्व’ पाहायला मिळेल एवढे मात्र निश्चित!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका