नगरपरिषदेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
घाटबोरी, प्रतिनिधी

हैं तैयार हम! मेहकरात काँग्रेसचा उसळला जनसागर
नगरपरिषदेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेला, कष्टकरी शेतकऱ्यांना भूलभापा देऊन शेतकरी व जनतेच्या विरोधात निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. मेहकर मध्ये नगरपरिषदेच्या अनुषंगाने कॉग्रेसपक्षाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रदेशाध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यापुढे म्हणाले की, आज महाराष्ट्रात सर्वसामान्य जनता महागाईमुळे होरपळून गेली, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात भाव नाही, श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय तर गरीब माणूस हा गरीब होत चालला आहे. त्यामुळे ही लढाई नगरपरिषदेची असली तरी ‘सर सलामत तो पगडी पचास’… ही लढाई सत्य अहिंसेची लढाई आहे. त्यामुळे नगरपरिषदेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले, यापुढे म्हणाले की, आज कॉग्रेसपक्षाच्या व्यासपीठावर सर्वजन हातात हात देऊन एकाच मंचावर आहेत, येथे एकसंघाची मोळी बांधण्याचे काम वानखेडे वकील आणि देवानंदने केले त्यांनी विचाराची मोळी बांधली आहे, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतोय, फटाक्यांची आतिशबाजी, फुलांची उधळण आणि ढोलताशाच्या गजरात माझे स्वागत झाले त्यामुळे मला जरा विसर पडल्यासारखे झाले, जणूकाही मेहकरात कॉग्रेसच्या नगराध्यक्षाची विजयी मिरवणूक आहे काय!असे वाटले, हा दृष्ट लागणारा कार्यक्रम आहे, त्यामुळे दृष्ट लागू देऊ नका, श्यामभाऊ आणि घुमरे हे दोघेही क्लासमेंट्स आहेत आज हातात हात घालून एकत्र बसलेले आहेत, ‘हम साथ साथ है, हे त्यांनी दाखवून दिले त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो, आता गटबाजीला उत आणु नका, तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण तिकिट एकच आहे. असे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले, यापुढेही सपकाळ म्हणाले की, पारदर्शक निर्णय कॉग्रस घेणार आहे जिल्हा कॉग्रेस कमटीचे अध्यक्ष आप्पा आहेत आणि आप्पा हिशोबात पक्के असतात, त्यामुळे त्यांच्यावर मला आणि तुम्हालाही विश्वास आहे. ते मापात पाप करीत नाहीत. जिल्हा पक्षनिरिक्षक राजेन्द्र राख हे त्यांच्या एकाबाजूला कासमभाईला तर दुसऱ्याबाजूला विलास चनखोरे यांना घेऊन बसलेले आहेत. त्यामुळे जिल्हा पक्षनिरिक्षक फिकॉलचे काम करणार आहेत. याठिकाणी कॉग्रेसपक्ष या मातीत घट्ट पाय रोवून बसलेला आहे. येणारा काळ कॉग्रेसपक्षाचा आहे, आता फक्त ओन्ली कॉग्रेस, त्यासाठी कुर्बानी देण्याची वृत्ती असली पाहिजेत, पुढील काळात महाराष्ट्रात कॉग्रेसपक्षाची सत्ता येणार आहे. त्यामुळे कोणी बलिदान दिले, कोण एकनिष्ठ राहिले त्यांचा विचार नक्कीच होणार आहे आणि कपडे बदलणाऱ्या भामट्यांचा ही रजिस्टरमध्ये आता नोंद होणार आहे. त्यामुळे ज्याला कोणा एकाला तिकिट मिळेल त्याचे काम सर्वांनी ताकदीने करुन मेहकर नगरपरिषदेवर कॉग्रेसपक्षाचा झेंडा फडकवा आता फक्त ओन्ली कॉग्रेस. असे सांगून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉग्रेसपक्षातील नेत्यांची दुभगंलेली मनाची मोट बांधून आता ओन्ली कॉग्रेसचा नारा देत कॉग्रेसपक्षाचा झेंडा फडकिवण्याचे आवाहन केले आणि सत्ताधाऱ्यांवर सडकवून चौफेर टीका केली. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार धिरजभाऊ लिंगांडे, प्रदेश सरचिटनीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश सचिव रामविजय बिलगुले, जिल्हाध्यक्ष राहुल बोंदे, जिल्हा पक्षनिरिक्षक राजेन्द्र राख,कॉग्रेसनेते लक्ष्मनदादा घुमरे, माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, अॅड अनंतराव वानखेडे, तालुकाध्यक्ष प्रदीपबापु देशमुख, देवानंद पवार, शहराध्यक्ष पंकज हजारी, सेवादलचे प्रदेश सरचिटनीस शैलेश बावस्कर, नारायण पचेरवाल यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन माधुरी देवानंद पवार व शहराध्यक्ष पंकज हजारी यांनी केले तर आभार सेवादलचे शैलेश बावस्कर यांनी केले.
कॉग्रेसपक्षाची सत्ता आणण्यासाठी जिवाचे रान करा ; श्यामभाऊ उमाळकर
येथे सर्व जातीधर्माचे लोक कॉग्रेसपक्षात आहेत आणि सर्वांचा विश्वास कॉग्रेसवर आहे. म्हणून येथे त्यांच्यामुळेच कॉग्रेस जिवंत दिसत आहे. कॉग्रेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकवेळी घटकपक्षाचे प्रामाणिकपणे काम केलेले आहे. आता येत्या निवडणुकीत ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्यांचा विजय करण्यासाठी आपण सर्वांमिळुन एकत्र लढू आणि मेहकर नगरपरिषदेवर कॉग्रेसपक्षाची सत्ता आणण्यासाठी पंजा निशाणीवर आपल्याला शिक्का मारायचा आहे. त्यासाठी सर्वांनी जिवाचे रान करून नगरपरिषदेवर कॉग्रेसपक्षाचा झेंडा फडकावा असे आवाहन प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर यांनी उपस्थित जनसमुदायासमोर कॉग्रेसपक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.
येथील आमदार कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलेला आहे; लक्ष्मनदादा घुमरे
मेहकरचा आमदार स्वतःच्या पक्षाच्या भरोश्यावर निवडून आले नाहीत तर कॉग्रेसपक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर निवडून आलेले आहेत. येथे त्यांच्या पक्षाची अजिबात ताकद नसतानाही येथे तळागाळातील कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने या मतदारसंघाचा आमदार निवडून आणलेला आहे याचा विसर पडता कामा नये, आम्हाला खऱ्या अर्थाने त्यावेळी येथील प्रस्थापितांना हरवायचे होते म्हणून आजच्या आमदारला आम्ही निवडून आणलेले आहे, येथे कॉग्रेसपक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसपक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कॉग्रेसपक्षाचा कार्यकर्ता सज्ज झाला आहे. ज्याला कोणाला हायकमांड तिकीट देईल त्यांचे काम आम्ही एकनिष्ठ करु अशी ग्वाही याप्रसंगी कॉग्रेसचे नेते लक्ष्मनदादा घुमरे यांनी दिली.
कॉग्रेसची सभा ठरली विजयाची नांदी!
मेहकर शहरात कॉग्रेसपक्षाची बैठक होणार होती मात्र, बैठकीचे नियोजन रद्द करत त्या ऐवजी मेहकरच्या स्वातंत्र्य मैदानात कॉग्रेसपक्षाच्या सभेचे आयोजन सर्व कॉग्रेसप्रेमी नेत्यांकडून करण्यात आले होते. या सभेसाठी मेहकर शहरात कॉग्रेसपक्षाचा उसळलेला जनसागर पाहुन चांगल्या-चांगल्याच्या भुवया उंचावलेल्या होत्या, गेल्या नऊ वर्षांनी पुन्हा मेहकर शहर कॉग्रेसमय झाले होते. मोठ्या प्रमाणात कॉग्रेसप्रेमी एकसंघाने घराच्या बाहेर पडले होते, विशेष म्हणजे महिलावर्गांची लक्षणीय उपस्थिती होती. कॉग्रेसपक्षाच्या मतदारांनी स्वातंत्र्य मैदान भरगच्च भरलेले होते, स्वातंत्र्य मैदानात बसण्यासाठी जागा कमी पडलेली होती, इतका मोठा कॉग्रेसमतदारांचा जनसागर उसळला होता. जणूकाही ती सभा विजयाची नांदी ठरवणारी ठरली, मोठमोठे कॉग्रेसनेत्यांचे होल्डिंग, ठिकठिकाणी कटाऊट बॅनर, कॉग्रेसचे झेंडे, भव्यदिव्य व्यासपीठासमोर शामिनामंडप, बसण्याची सुसज्ज व्यवस्था आणि शहराच्या प्रभागामधून विविध भावी नगरसेवकांची ढोल-ताशामधील मिरवणूक जणूकाही विजयी मिरवणूक असावी असे ते क्षणचित्र माणसाला आकर्षित करणारे दिसत होते. या उत्साहापुर्ण वातावरणात कॉग्रेसपक्षाची सभा पार पडली त्यावेळी शहरातील वातावरण कॉग्रेसमय झालेले पाहायला मिळाले.




