
माणसांचा सेतू उभारणारा किमयागार; देवानंद पवार
लोक त्यांना “सेतू” म्हणतात. कारण ते फक्त मनं जोडत नाहीत— तर ते हृदय आणि हृदय यांच्यात दयाळूपणाचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा पूल बांधतात.
जग वेगाने बदलत आहे; माणसांचे गणित वाढत आहे पण माणुसकीचे मोजमाप कमी होत चालले आहे. यशाच्या, प्रसिद्धीच्या आणि पदाच्या स्पर्धेत धावताना लोकांना एखाद्याच्या डोळ्यातील वेदना दिसेनाशी झाली आहे. आणि अशा काळातही एखाद्या माणूस शांतपणे उभा राहतो – नाही, उभा राहत नाही… तो इतरांना उभं करतो. असाच एक नाव म्हणजे देवानंद पवार, ज्यांच्या कर्तृत्वाची फुले गाजावाजाने नाही, तर लाखो मनांच्या विश्वासाने उमलतात. देवानंद पवार हे नाव मोठं आहे म्हणून नाही, तर ते माणसांचा हात धरतात म्हणून मोठं आहे. त्यांच्यातील संवेदनशीलता ही केवळ गुण नाही… ती त्यांच्या अस्तित्वाची ओळख आहे. देवानंद पवार… एक नाव, पण अर्थ हजार. त्यांची वाटचाल फक्त स्वत:ची नव्हे तर — ती आहे माणसांना माणसांशी जोडणारी, मनांना मनांशी विवणारी. गावागावांत तुटलेल्या नात्यांत संवादाचे धागे गुंफणारी, अनेक भांडणाना समजावून शांत केले, निराश मनाना धीर दिला आणि आयुष्याच्या अंधाऱ्या वळणांवर त्यांनी प्रकाशाचा दिवा बनून साथ दिली. म्हणूनच लोक म्हणतात — “देवानंद पवार नाहीत फक्त नाव … ते आहेत जिव्हाळ्याचा स्पर्श देणारा माणसांचा ‘सेतू’ उभारणारा किमयागार.”
मेहकर तालुक्यातील हिवरा खु. येथील रहिवासी असलेला हा देवानंद पवार असून आज देवानंद पवार तालुक्यात कॉग्रेसपक्षाचा समन्वय पदाची जबाबदारी निभावतात. सन: २००३ चा काळात देवानंद पवार सोबत माझ्या मैत्रीचे घट्ट ऋणानुबंध जुळले. देवानंद आणि मी दोघेही एलआयसी एजंट म्हणून अमरावतीला परिक्षा दिली आणि दोघेही एलआयसी मध्ये एकमेकांच्या जिद्दीने पॉलिसी काढण्यात, माणसांना जोडताना त्यांचा सेतू उभारणारण्या प्रयत्न करीत होतो. त्यावेळी माणसांना माणूस जोडण्यात मला कमी पाठबळ मिळाले म्हणून काही कारणास्तव एलआयसी मधुन मी बाद झालोय म्हणजे माझी विकेट पडली असे म्हटले तरी चालेल. मात्र, देवानंद पवार यांने तर अवघ्या तीन वर्षातच चांगल्या लोकांच्या सहवासात एलआयसी मध्ये तर विक्रमच केला. सातत्याने माणसाला एक-एक माणूस जोडत माणसांची माळ गुंफण्यात देवानंद पवार यांनी माणसांचा सेतू उभारला म्हणून तो किमयागार ठरला. तेव्हापासून आजपर्यंत देवानंद पवारांनी समाजाच्या प्रवाहात माणसाला जोडण्याची कला अवगत केल्याने तो पुढे-पुढे सरकत त्याने लाखो माणसाच्या मनात आपल्या प्रेमाचा, आपुलकी, जिव्हाळा आणि वात्सल्याचा ओलावा निर्माण करुन मेहकर मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर दूरपर्यंत हा माणूस कर्तृत्वाने बहरतो आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा परिमळ समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात दरवळतो… म्हणून देवानंद पवार यांचे कर्तृत्व आज त्या सुवासाने असंख्य हृदय उजळत आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देवानंद पवार राजकीय पदासाठी लढणारा व्यक्ती नसून; तो समाजाला जोडणारा, लोकांच्या समस्या समजून घेणारा आणि प्रत्येकाच्या भल्यासाठी कटिबद्ध असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी फक्त राजकारणातच नाही, तर समाजकार्याच्या क्षेत्रातही आपले ठळक योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांना नवजीवन मिळाले, वंचित घटकांना न्याय आणि मदत मिळाली आहे. देवानंद पवार यांनी नेहमीच जनतेच्या मनाशी संवाद साधला आहे. प्रत्येक गल्ली-चौकात ते लोकांच्या समस्या ऐकतात, समजून घेतात आणि तत्काळ उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या कटिबद्धतेमुळे वंचित आणि गरजू लोकांमध्ये त्यांच्याप्रती असलेला विश्वास दृढ झाला आहे. फक्त भाषणांनी नव्हे, तर कार्यानेही त्यांनी दाखवले की ‘नेते म्हणजे सेवा करणारा’. त्यांनी समाजातील विविध उपक्रम राबवले आहेत. आरोग्य शिबिरे, शिक्षणासाठी मदत, वृद्ध आणि अनाथ लोकांसाठी आधारकेंद्रे – या सर्व उपक्रमांमुळे त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांना जोडले आहे. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये फक्त प्रशंसा निर्माण होत नाही, तर समाजातील एकात्मतेचा संदेशही पोहोचतो.
देवानंद पवार हे माणसांना जोडणारे नेता आहेत. त्यांच्या कार्यामुळे विविध समाजघटकांमध्ये समन्वय वाढला आहे, संघर्षमय परिस्थितीतही लोकांमध्ये आशेचा किरण उगवला आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे गरीब, अनाथ, वृद्ध आणि शोषित लोकांना आधार मिळाला आहे. प्रत्येकाला न्याय मिळावा, प्रत्येकाला सन्मान मिळावा यासाठी त्यांनी आपला वेळ, श्रम आणि मन समर्पित केले आहे. सोबतच तुटलेल्या हृदयाला जोडतात, मनातील विवाद मिटवतात आणि समाजातील सामंजस्य राखतात. त्यांच्या कार्यशैलीत संयम, संवाद आणि संवेदनशीलतेचा समन्वय आहे. हेच त्यांचे अनमोल कार्य आणि नेतृत्त्वाचे खरे दर्शन आहे. देवानंद पवार यांचा समाजासाठी दिलेला हात हे एक उदाहरण आहे, ज्यातून आपण शिकतो की, माणूस माणसाला जोडू शकतो, समाजात विश्वास आणि एकता निर्माण करू शकतो. लोक म्हणतात… “देवानंद पवार हे फक्त माणूस नाहीत; ते मनांचा दुवा आहेत, ज्या लोकांना एकत्र आणतात आणि समाजात सामंजस्य रुजवतात.” तो माणसांचा सेतू उभारणारा किमयागार तर आहेच– विश्वास, प्रेम आणि संवादाचा पूल आहे. या सामाजिक उभारणीच्या प्रक्रियेत देवानंद पवार आदर्श व्यक्तिमत्व असून माणसांचा “सेतू” उभारणारा किमयागार आहे.



