
“निराधारांची सावली“: अॅड. माधुरी देवानंद पवार
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती…सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी….
कधी कधी आपल्याला आपले दुःख आणि संकटे इतकी व्यापून घेतात की त्याच्या पलीकडे काही दिसतच नाही. जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फायद्यात गुंतलेला असतो, अशा माणुसकी हरवत चाललेल्या या आधुनिक काळात, जिथे लोकांमध्ये स्वतः साठी झगडण्याची होडी चढवलेली दिसते, तिथे काही व्यक्ती असतात , जे आपल्या कृतीतून दूसऱ्यांसाठी आदर्श ठरतात. माणुसकीची दृष्टी जपून गरीब, अनाथ आणि गरजू लोकांच्या जीवनात आनंदाची हिरवळ फुलविण्यासाठी अत्यंत शांतपणे आणि दृढतेने आपल्या दातृत्वाच्या ओंजळीने इतरांच्या जीवनात प्रकाशाचा एक किरण निर्माण करतात. आणि आपल्या कृतीतून समाजासाठी नि:शब्द आदर्श ठरतात. अशा व्यक्तिमत्वांमध्ये एक मेहकर तालुक्यातील जानेफळ जि.प. सर्कलमधील अॅड. माधुरी देवानंद पवार यांचे नाव खूपच उज्ज्वल आहे. समाजातील गोरगरीब, निराधार, वंचितांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देऊन त्यांच्या वेदनेचे निरागस अश्रु माधुरी हळुवारपणे आपल्या पदराने पुसत आहे. त्यांच्यावर कोसळणाऱ्या वेदनेच्या पाऊसातही आपल्या कमरेला पदर खोचून त्या भरकटलेल्या वादळातही माधुरी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या निराधारांच्या पाठीशी उभी राहुन त्यांच्या डोक्यावर करुणेच्या मायेची छत्री धरुन सावली देत आहे. त्यांच्यासाठी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजाच्या वंचित, गरीब आणि निराधार घटकांच्या हितासाठी समर्पित केला आहे. माधुरीच्या हृदयात निःस्वार्थ सेवा, सहानुभूती आणि मानवतेचे प्रेम ओथोंबलेले आहे की, माधुरीला कोणत्या शब्दात मांडावे ते शब्दांना कोडे पडलेले आहे. इतकं अलौकिक गुणात्मक पैलूच्या दातृत्वाने माधुरी प्रखर तेजोमय झाली आहे. ते कागदावर लिहून सांगणं कठीण आहे. त्यांनी नेहमीच स्वतःच्या भुकेच्या, निराशेच्या आणि एकाकी असलेल्या माणसाच्या सोबतीला उभं राहून, त्याच्या दुःखाशी सामंजस्य साधलं आहे. माधुरीच्या कामाची महती इतकी मोठी आहे की, त्या गोरगरीब, निराधार, वंचिताच्या पाठीशी खरोखरच सावली बनून उभ्या राहतात, पंखात बळ देण्याचे काम करीत असतात. म्हणून अॅड. माधुरी देवानंद पवार या नावाने समाजातील असंख्य निराधारांच्या जीवनात नवा उमेद, नवा विश्वास, आणि जीवन दर्शन मिळवल्याने अॅड. माधुरी पवार “निराधारांची सावली” म्हणून ओळखले जाते. अॅड. माधुरी देवानंद पवार यांचे जीवन म्हणजे निराधारांच्या जीवनात बहर आणणाऱ्या त्या सुगंधी वाऱ्याप्रमाणे आहे, जो सणकतो आणि हळुवारपणे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचतो. त्यांचा कार्यप्रवास म्हणजे गरीब, अनाथ, वृद्ध आणि शोषित वर्गांच्या हितासाठी केलेला एक अखंड संघर्ष आहे. अॅड. माधुरी पवार यांनी केवळ कायद्याच्या माध्यमातून न्याय दिला नाही, तर त्यांनी दिलेले शब्द, त्यांचा शांत, सोज्वळ, मार्गदर्शन आणि सुसंस्कार समाजातील प्रत्येक घटकासाठी एक मायेचा आधार ठरला आहे. अॅड. माधुरी पवार यांचे कार्य केवळ कायद्याच्या माध्यमातून नाही, तर त्यांच्या व्यक्तिगत कर्तृत्वातून समाजाच्या प्रत्येक घटकाला एक सुसंस्कारित जीवन देण्याचा प्रपंच आहे. त्यांनी केवळ न्याय दिला नाही, तर त्यांचं प्रत्येक शब्द, वागणूक, आणि नेतृत्व हे सर्वांना एक सकारात्मक दिशा देणारं ठरलतं आहे. त्यांची मदत फक्त शारीरिक किंवा आर्थिक स्वरूपापेक्षाही आत्मिकता, जिव्हाळा, वात्सल्याची मानसिक आणि भावनिक आधार देणारी आहे. जानेफळ जि.प. सर्कलमधील अॅड. माधुरी देवानंद पवार ह्या कर्तृत्ववान महिलेने आपल्या भुकेपेक्षा दुसऱ्यांच्या उपाशीपणाला अधिक महत्त्व देण्याचा आदर्श समाजाला दिला आहे. हे एक कठीण आणि अविस्मरणीय कार्य इतिहासात नोंद घेण्यासारखे आहे. जे कोणत्याही राजकारणी आणि समाजसेवकाच्या कामाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याची क्षमता राखते. माधुरी पवार यांच्या कार्याची महती इतकी मोठी आहे की, त्या गोरगरीब, निराधार, वंचित वर्गाच्या पाठीशी खरोखरच सावली बनून उभ्या राहतात. एक सावली जी कधीही ओसरत नाही, एक असं बळ जी निरंतर वाढते आणि इतरांच्या आयुष्यात एक नवा विश्वास, उमेद आणि धैर्य जागवते. त्यांच्या कार्यप्रवासामध्ये त्यांनी अनेक लोकांना नवा दृष्टिकोन दिला, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली आणि त्यांची अवस्था बदलण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्यांचं जीवन आणि कार्य हा समाजातील असंख्य लोकांसाठी एक मार्गदर्शक प्रकाश आहे. आज अॅड माधुरी पवार यांना “निराधारांची सावली” म्हणून ओळखले जात आहे, कारण त्या निराधार, गरजू आणि वंचित घटकांसाठी एक असलेला न थांबणारा आधार आहेत. त्यांच्या कृतीतून समाजाने एक नवा आदर्श घेतला आहे, जो प्रत्येकाच्या हृदयात जिवंत राहणार आहे. सामाजिक कार्यासाठी आणि इतरांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी अॅड. माधुरी पवार यांचा समर्पण आणि संघर्ष निःसंशय अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांचं जीवन असंख्य लोकांच्या आयुष्यात एक उज्ज्वल स्टार म्हणून चमकलं आहे, आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी ज्या सावलीचा प्रकाश दिला आहे, तो कधीही डिम्बणार नाही. त्यांच्या कार्याची महती जितकी मोठी आहे, तितकेच त्यांचं दातृत्व समाजाच्या प्रत्येक श्रेणीत एक नवा विश्वास आणि आशा निर्माण करत राहील. हजारो निराधारांच्या जीवनांना उजाळा देत ती एक आशीर्वाद असलेल्या सावलीसारखी आहे. म्हणूनच अॅड माधुरी देवानंद पवार “निराधारांची सावली” आहे.
___________________________
कधी कधी ” निराधार” हा शब्द फक्त शब्द होतो, त्याला जीवनात काही अर्थ दिला जात नाही. पण अॅड.
माधुरी देवानंद पवार यांनी “निराधार” शब्दाला एक गहिरे अर्थ दिला आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे, त्या निराधारांना आधार मिळाला आहे. त्यांच्यात विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासाने जीवन पुन्हा एक नवा ध्यास घेत आहे. त्या निराधारांना काहीतरी हरवलेलं असताना, त्यांनी दिलेल्या मदतीने त्यांचं जीवन आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा एक नवा मार्ग बनला. अॅड. माधुरी देवानंद पवार यांच्या मदतीमुळे कित्येक लोकांचे आयुष्य पुन्हा पुनरुज्जीवित झाले आहे. त्यांच्या कामाची महत्ता तिथेच आहे, जेव्हा त्या समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा अनुभव देत आहेत. “निराधार” असलेल्या व्यक्तींना त्यांनी दिलेला आधार हा एक अनमोल उपहार आहे.


