राजकारण

विलास चनखोरे यांची हवा… विलास दादा, ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’…

घाटबोरी, प्रतिनिधी

 

विलास चनखोरे यांना मेहकर शहरात जनतेचा वाढता पाठिंबा!

विलास दादा ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’

नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी मेहकर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारीला वेग आला आहे. मात्र, कॉग्रेसपक्षाचे प्रबळ दावेदार म्हणून विलास चनखोरे पुढे आले असून, त्यांच्या प्रचार मोहीमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनसंपर्क वाढवून मतदारांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. विलास चनखोरे यांनी कॉग्रेसपक्षाची उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरच मेहकर शहरातील मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान त्यांना वाढता पाठिंबा आणि वयोवृद्धांचा आशीर्वाद मिळत आहे. विलास चनखोरे हे जनतेच्या मनातील उमेदवार असून त्यांनी आयुष्यभर जनता-जनार्दनाची सेवा करण्यात आयुष्य खर्ची घातलेले आहे. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन समाजाची निष्ठेने सेवा केलीली आहे. त्यामुळे आज विलास चनखोरे मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान त्यांना भक्कमपणे मतदारांचा आशीर्वाद मिळत असल्याने विलास चनखोरे यांची जेमेची बाजू आहे. या अनुषंगाने विलास चनखोरे यांच्या प्रचार भेटीगाठी दरम्यान शहरामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केलेली आहे. सोबतच प्रचारभेटीगाठी दरम्यान त्यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. विविध प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना असंख्य तरुणांनी जल्लोष पुर्ण वातावरणात, विलास दादा,’तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’… अशा घोषणाबाजी करत शहर दणाणून सोडले आहे. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शहरातील मोठ्या संख्येने मतदार त्यांच्या सोबत होते. विलास चनखोरे यांच्या पाठीशी असलेला हा जनसमुदाय पाहुन अनेकांना वाटते की विलास चनखोरे यांची उमेदवारी निश्चित झाल्यास नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचा विजय मानला जात असल्याची चर्चा संपुर्ण शहरात रंगत आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, माजी नगरसेवक रवींद्र सावजी, महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे सरचिटणीस शैलेश बावस्कर, युवा नेते विकास पवार यांच्यासह माजी न. पा. उपाध्यक्ष शेखचांद कुरेशी, माजी नगरसेवक संजय म्हस्के, माजी नगरसेवक उस्मान शाह, माजी नगरसेवक अलियार खांन, युवा नेते वैभव उमाळकर, नारायण पचेरवाल, युनुस पटेल, रियाज कुरेशी, मुनाफ खान, नारायण इंगळे, शाहू गवळी, रामेश्वर पिटकर, संतोष मानवतकर, दिपक माने, अनुप चनखोरे, बबलू पवार, यांच्यासह अनेक कॉग्रेसपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध प्रभागांमधील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका