ताजे अपडेट

डोणगाव ठाणेदारपदी गणेश इंगोले यांची नियुक्ती

घाटबोरी, प्रतिनिधी

 

डोणगाव ठाणेदारपदी गणेश इंगोले यांची नियुक्ती

डोणगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अमरनाथ नागरे यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अशोक इंगोले यांची ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश इंगोले यांनी यापूर्वी लोणार शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी बजावली आहे. शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि जनसुरक्षेला प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक सलोखा अबाधित राखत जातीय सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यापूर्वीही त्यांनी बुलढाणा शहरासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. डोणगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे अबाधित राखण्याची तसेच गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारी प्रवृत्तींवर अंकुश बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संत कबीरांच्या विचारांची आठवण करून देणारी त्यांची कार्यशैली, “कबिरा खड़ा बाजार में, मांगे सबकी खैर”, ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर” या भावनेतून निष्पक्षपणे आणि निर्भयपणे कर्तव्य बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका