
अलोट गर्दी: जनतेकडून विलासजी चनखोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव …
विलास चनखोरे म्हणजे जनतेच्या मनातील ‘भावी नगराध्यक्ष’ ; श्यामभाऊ उमाळकर
विलास चनखोरे यांचे कुटुंब म्हणजे गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य वंचितांच्या सुखदुःखात सहभागी होऊन, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आहे, मोठ्या आपुलकीच्या भावनेने गोरगरीबांच्या जीवनात आनंदाचा झरा निर्माण करणारा हा मेहकर शहरातील चनखोरे परिवार आहे. त्याचं चनखोरे परिवाराच्या सुसंस्कृत संस्कारांची शिदोरी घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून विलास चनखोरे हा माणूस गोरगरीब, जनता-जनार्धन मायबापाची सेवा करीत आहे. राजकारणापेक्षा त्यांना समाजसेवेत जास्त रस आहे, म्हणूनच मेहकर शहरातील जनता-जनार्धन सातत्याने विलास चनखोरे यांच्या पाठीशी उभे राहतात, नेहमीच भरभरून आशीर्वाद देत असतात. आताही नगरपालिकेचे पडघम वाजायला सुरुवात झाली म्हणून मेहकर शहरातील जनता-जनार्धनाच्या आग्रहावास्तव विलास चनखोरे हे जनतेची सेवा करण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे विलास चनखोरे हे जनतेच्या मनातील ‘भावी नगराध्यक्ष’ आहेत. माझाही आशीर्वाद विलास चनखोरे यांना आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज विलास चनखोरे यांचा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांना दीर्घार्युरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय, असे प्रतिपादन कॉग्रेसपक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात मंगलमय शुभेच्छा देतानी भाष्य केले.
माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांचा वाढदिवस मेहकर शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गेल्या दोन दिवसांपासून विलासजी चनखोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. सोशल मीडियावर तर अक्षरशः अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव वाहत होता. वाढदिवसाच्या रोजी सायंकाळी चनखोरे परिवाराकडून स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शुभेच्छांच्या व्यासपिठावर अनेक मान्यवर उपस्थित होते, तेव्हा शुभेच्छा देण्यासाठी शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यामध्ये माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार सिद्धार्थ खरात, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, सुप्रसिद्ध डॉक्टर अनिल गाभणे, डॉक्टर संजय लोहिया, नामवंत समाजसेवक गोपालभाऊ मोदानी, माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, मेहकर विधानसभा पक्षनेते अॅड अनंतराव वानखेडे, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, जिल्हा सरचिटणीस कलीम खान, माजी नगरसेवक पंकज हजारी, माजी नगरसेवक रवींद्र सावजी, माजी नगरसेवक अॅड जगन्नाथ निकस, माजी नगरसेवक प्रा. डि.जी. गायकवाड, माजी नगरसेवक अनिल शर्मा, माजी नगरसेवक उस्मान शाह, माजी नगरसेवक अलियार खान, माजी नगरसेवक अलीम ताहीर, माजी नगरसेवक मुजीब कुरेशी, माजी नगरसेवक सुरेश मानवतकर, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव ढाकरके, विकास पवार, रियाज कुरेशी, याकुब खान, यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, पत्रकार नागेश कांगणे, पत्रकार रफिक कुरेशी, पत्रकार ओमप्रकाश देवकर, पत्रकार सुनील मोरे, पत्रकार संतोष जाधव, पत्रकार अविनाश लाड, पत्रकार प्रल्हाद भिसे यांच्यासह शहरातील सर्वच व्यापारी बांधव, शहरातील डॉक्टर, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व विलासजी चनखोरे यांचे मित्रमंडळी फार मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी सदर अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन युनुस पटेल यांनी केले तर आभार नारायण पचेरवाल यांनी मानले.
—————– ————————————————-
विलास चनखोरे हा निर्मळ मनाचा साधा माणूस ; डॉ. राजेंद्र शिंगणे
विलास चनखोरे आणि आमच्या शिंगणे परिवाराचे कौटुंबिक नाते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची आज आवश्यकता नाही. विलास चनखोरे यांना मी लहानपणापासून ओळखतो, त्यांच्यात नेतृत्व गुणांचे अनेक पैलू आहेत. त्याला सामाजिक कार्याची आवड, गोरगरीबांबद्दल असलेली कणव आणि सर्वसामान्यांबद्दल त्याच्या मनात आदराची, आपुलकीची आणि प्रेमाची भावना आहे. निर्मळ मनाचा साधा माणूस म्हणून जनसामान्यांत आपली प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. मुरब्बी राज्यकर्त्यांप्रमाणे त्यांची समाजकारण आणि राजकारणातील वाटचाल कौतुकास्पद आहे. त्यामुळे एक समृद्ध आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून विलास चनखोरे यांचा उल्लेख करावा लागेल. अशा भावना माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानी विलासजी चनखोरे यांना आशीर्वाद दिला आहे.
विलासजी चनखोरे म्हणजे मोठ्या मनाचा माणूस ; अॅड अनंतराव वानखेडे
विलासजी चनखोरे यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीचा धागा जुळलेला आहे. त्यांना मी अगदी जवळून पाहतोय, पण हा माणूस जरा इतरांपेक्षा वेगळा आहे. बोललेला शब्द पाळणारा, मैत्रीला जपणारा आणि समाजात दातृत्वाचा, मातृत्वाचा व मोठ्या मनाचा माणूस म्हणून समाजात विलासजी चनखोरे यांची ओळख आहे. अशा कर्तबगार व्यक्तिवर वाढदिवसानिम्मीत होत असलेला फुलांचा वर्षाव पाहुन हे जनतेच्या मनातील नेतृत्व आहे असे वाटते. त्यांना शब्दात मोजण्याची माझी ताकद नाही. त्यांच्याबद्ल निश्चितच अभिमान वाटतो. येणारा काळ हा विलासजी चनखोरे यांचाच असून भविष्यात ते नगराध्यक्ष म्हणून आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी निश्चित येतील, अशा शब्दांत अॅड अनंतराव वानखेडे यांनी विलासजी चनखोरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जनतेची सेवा हेच माझे ध्येय; विलासजी चनखोरे
माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांच्या वाढदिवसानिम्मीत गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा महापूर वाहत होता. शहरात लागलेले मोठमोठे अभिनंदनाचे होडिंग, ठिकठिकाणी केक कापून, शाल श्रीफल देऊन शुभेच्छा आणि मतदारसंघातील नागरिकांसह जिल्हाबाहेरुन आलेले अनेक जिवाभावाचे राजकीय, सामाजिक मित्रमंडळी आणि मेहकर शहरातील नागरीकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत केलेली फुलांची उधळण व त्यांचे प्रेम, आपुली, जिव्हाळा पाहुन माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांना आपल्या सत्काराला उत्तर देतानी अक्षरशः भारावून गेले होते, मन गहिवरले होते. त्यावेळी विलासजी चनखोरे म्हणाले की, मायबापांनो तुमचे प्रेम पाहुन मी निःशब्द झालो, तुमचे ऋण फेडणे माझ्याकडून खरचं शक्य नाही. सदैव तुमच्या ऋणातच आहो. तुम्हीच माझी उर्जा असून तुमची सेवा हेच माझे ध्येय आहे. अशा भावना माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतानी म्हंटले आहे.



