विलासजी चनखोरे यांचे नाव ‘भावी नगराध्यक्ष’ म्हणून आघाडीवर!

विलासजी चनखोरे यांचे नाव ‘भावी नगराध्यक्ष’ म्हणून आघाडीवर !
आगामी नगरपालिका निवडणूकीच्या आखाड्यात सर्वच गटातटाच्या उमेदवारांची उमेदवारीसाठी धावपळ असून प्रत्येकात रस्सीखेच आहे. पण, एकमेव मेहकर नगरीचे माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे हे उच्च शिक्षित, सौम्य आणि मनमिळावू स्वभाव व राजकीय पक्षाचा अनुभव, पक्षासाठी त्यांचा त्याग, समाजहितासाठी त्यांची तळमळ पाहता त्यांच्या नावाला सर्वाधिक लोकप्रिय पसंती आहे. म्हणूनच नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांची उमेदवारी सरशी ठरली आहे. आता कॉग्रेसपक्षाकडून विलासजी चनखोरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे त्यांचे नाव ‘भावी नगराध्यक्ष’ म्हणून आघाडीवर आहे. आगामी नगरपालिका निवडणूकीत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराचे काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून उबाठा शिवसेना गटाला उमेदवारी दिली होती. त्यानंतर मेहकर विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीमधून उबाठा शिवसेना पक्षाचा आमदार कॉग्रेसपक्षानी निवडून आणलेले आहे. आता परत उबाठा शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पदासाठी धावपळ करीत असल्यामुळे तमाम कॉग्रेसप्रेमी मतदारात नाराजीचा सुरु उमटलेला आहे. त्यामुऴे महाविकास आघाडीची तुटातुट झाली तरी चालेले पण मेहकर नगरीचे नगराध्यक्षपद कॉग्रेसपक्षाच्या वाट्याला आले पाहिजेत म्हणून सर्वांच्या मते माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ घालावी म्हणून सर्वांनी विरिष्ठ नेत्यांकडे गळ घातलेली आहे. त्यामुळेच जनता जनार्दनाच्या आग्रवास्तव माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे नगरपालिकेचे मैदानात जोरदार मुसंडी मारणार आहेत. विलासजी चनखोरे यांचे नाव पुढे येताच चांगल्या-चांगल्याची भंबेरी उडलेली आहे. विलास चनखोरे हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असल्यामुळे मेहकर शहरात यांच्या नावाला सर्वाधिक लोकप्रिय पसंती आहे. विशेष म्हणजे विलासजी चनखोरे हे कॉग्रेसपक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व समाजसेवेचा वसा जोपासणारे असून ‘कॉग्रेसपक्ष हा त्यांचा प्राण’ असल्यामुळे केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, जिल्हाध्यक्ष राहुजी बोंद्रे यांचा विश्वासू सहकारी आणि पक्षासोबत एकनिष्ठ बांधिलकी म्हणून माझ्या नावाची ओळख आहे. त्यामुळेच आपल्या आधारस्तंभासह य जनता-जनार्दांनाचा आशीर्वाद माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांच्या सोबत असल्यामुळे ते जनहितासाठी नगरपालिकेचे मैदान गाजविणार आहेत. कॉग्रेसपक्षाचा झेंडा मेहकर नगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत फडकविल्या गेला पाहिजेत या उद्दात भावनेने माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे नगरपालिका निवडणूकीला सामारे जात आहेत. त्यांच्या स्वच्छ,निर्मळ भावना आणि आतापर्यतचे त्यांचे कार्यकर्तृत्व पाहता विलास चनखोरे यांची नगराध्यक्षाची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
हा विश्वास मेहकर शहरातील कॉग्रेसप्रेमी मित्रमंडळी चर्चाअंती बोलत आहेत. म्हणून ‘ज्यांची खरी सेवा,’त्याच्या भय काय जीवा’ या अभंगाच्या ओळी माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांना तंतोतंत लागू पडतात.



