कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक निलेशजी तांबे यांच्या वाढदिवसानिम्मीत पत्रकार बांधवाकडून हृदयस्पर्शी सत्काराचे आयोजन व विविध कार्यक्रमाची मेजवानी

कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक निलेशजी तांबे यांच्या वाढदिवसानिम्मीत पत्रकार बांधवाकडून हृदयस्पर्शी सत्काराचे आयोजन व विविध कार्यक्रमाची मेजवानी
जानेफळ येथे भव्य रक्तदान शिबीर व गोरगरीब,निराधार,अनाथ मुलांना कपडे वाटप, रुग्णालयात फळ वाटप, व सांयकाळी संदीपाल महाराजांचे समाजप्रबोधन किर्तन
पोलीस आणि पत्रकार एकाच समाजाचे घटक आहेत. उभय घटकातील समन्वय जेव्हढा पारदर्शक तेवढी नाळ अधिक घट्ट विणली जाईल याची जाण असलेले कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक निलेशजी तांबे यांच्या वाढदिवसानिम्मीत मेहकर तालुका पत्रकार बांधवांकडून जानेफळ नगरीत दि.१९ ऑक्टोंबर रोज रविवारला सांय-५ वाजता, जिल्हा पोलीस अधिक्षक निलेशजी तांबे यांचा हृदयस्पर्शी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्तानेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन जानेफळ येथेच करण्यात आले आहे, सोबतच या कार्यक्रमस्थळी गोरगरीब, निराधार,अनाथ मुलांना कपडे वाटप करण्यात येणार आहेत व येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात येणार आहे आणि सायंकाळी राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सप्तखंजेरी वादक संदिपाल महाराज (गिते) यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संतोष अवसरमोल, जा.ए.मु.संपादक अशोक शेजुळ यांनी दिली आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्वप्निल चव्हाण वैधकिय अधिकारी तथा स्त्रीरोग तज्ञ राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन, दातृत्वाच्या समाजसेविका अॅड माधुरीताई देवानंद पवार व ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गजानन चनेवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थितीत म्हणून बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झवर, सामाजिक कार्यकर्ते मोहनजी धोटे, जेष्ठ समाजसेवक गजानन पाटोळे, माजी सैनिक अर्जुनदादा गवई उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जानेफळ नगरीच्या सरपंच सौ. रुपालीताई वडणकर, जिल्हा ग्रा.प. संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू देशमुख, बुलढाणा परिवहन अधिकारी दिपाली सपकाळ, मारोतीपेठ सरपंच शैलजा गवई, सामाजिक कार्यकर्ते विलासजी कटारे, अॅड निखिल मिटकरी, अॅड संजय नवघरे, जेष्ठ नागरिक गजाननतात्या कृपाळ, अॅड शिव ठाकरे अध्यक्ष विवेकानंद अर्बन, शांतता समितीचे सदस्य हमिद मुल्लाजी, जेष्ठ पत्रकार सैय्यद महेबुब, डॉ. केशवराव अवचार अध्यक्ष तुळजाई अर्बन, डॉ धनंजय राठी अध्यक्ष अष्टविनायक अर्बन, कैलास पैठणे अध्यक्ष श्री.शि.शि.संस्था जानेफळ, डी.एस. लहाने अध्यक्ष शिवशाही अर्बन, गजानन गवई मुख्याध्यापक, किशोर गव्हाड सामाजिक कार्यकर्ते, मोहन कंकाळ माजी सैनिक, रामराव खंडागळे तंटामुक्ती अध्यक्ष मारोतीपेठ, रामेश्वर देवकर सामाजिक कार्यकर्ते, सुनील निंबेकर सामाजिक कार्यकर्ते, गजेंद्र माने आदर्श शिक्षक यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम मेजवानीची रेलचेल होणार आहे. तर सदर कार्यक्रम बहारदार सुत्रसंचालन, उत्तम वक्ते सिद्धेश्वर पवार ( दै.दैशोन्नती) व प्रा. कृष्णा हावरे सामाजिक कार्यकर्ते हे करणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, घाटबोरीचे पत्रकार तथा लेखक संतोष अवसरमोल, जानेफळ एक्स्प्रेसचे मुख्य संपादक अशोक शेजुळ, पत्रकार सुनील मोरे, पत्रकार किशोर इंगळे, पत्रकार संदिप ढोरे, पत्रकार प्रल्हाद भिसे यांनी सदर अभिष्टचिंतन सोहळाच्या निमित विविध कार्यक्रमांचे आयोजन जानेफळ येथे केले आहे. तरी सदर कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



