राजकारण

मेहकरात कॉग्रेसचं ठरलं!; नगरपालिका निवडणूक श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात लढणार?

घाटबोरी, प्रतिनिधि

 

मेहकरात कॉग्रेसचं ठरलं!; नगरपालिका निवडणूक श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात लढणार?

मेहकर मतदारसंघ एकेकाळी कॉग्रेसपक्षाचा बालेकिल्ला. परंतू कॉग्रेसपक्षाला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागल्यामुळे कॉग्रेसपक्षाची वाताहात झाली आणि अंतर्गत गटबाजीमुळे नेत्यांची मने दुभांगल्या गेलीत आणि कॉग्रेसपक्षाचा सुर्य माळवत गेलाय, त्यामुळे कॉग्रेसला नगरपालिका निवडणुकीत अनेकवेळा जय-पराजयाचा सामना करावा लागला. मेहकर शहरात कॉग्रेसपक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर आणि माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांच्यामधील गटबाजी काही नवीन नाही. यांच्या मधील अंतर्गत गटबाजी अनेकदा चव्हाट्यावर सुद्धा आली आणि त्याचा परिणाम अनेकदा निवडणुकीवर झाला हे सर्वसुस्त आहे. त्यामुळे कॉग्रेसपक्षाला लागलेली मरगळ दूर करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर अनेकवेळा प्रयत्नही झाले, पण वरीष्ठ नेत्यांनाही गटबाजीचे ग्रहण दूर करण्यात सतत ते अपयशी ठरलेत. यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांचीही वाताहत झाली. या गटात जाऊ का त्या गटात राहु अशी अवस्था सातत्याने निर्माण होत असल्याने कॉग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये सतत नाराजीचा सूर उमटत होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच, खुल्या आरक्षणात मेहकर नगरपालिकेचा ‘कारभारी’ कोण ? या झटापटीत कॉग्रेसचे जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या गटाचे माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे आणि माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी हे दोघेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवार असल्यामुळे वरिष्ठ पातळीवर तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत यांची रस्सीखेच सुरू झाली. पण एकाच पक्षातील दोन्ही तगडे उमेदवार असल्यामुळे यांच्या गटबाजीत मेहकर नगरपालिकेवर कॉग्रेसपक्षाचा झेंडा फडकणार नाही, पराभवाला सामोरे जावे लागणार याचं भितीने शहरातील अनेक इच्छुक नगरसेवकाच्या शर्यतीत असलेले दोन्ही गटातील उमेदवार आप आपल्या नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात झाली, कॉग्रेसला एकसंघ ठेऊन या निवडणुकीत गटबाजी न करता एकत्रितपणे निवडणूक लढवायची असा सुर उमटत होता. त्याचं अनुषंगाने जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर व माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांच्यातील कटुता दुर कशी करावी म्हणून अनेकांना प्रश्नही पडलेला होता. पण मेहकर शहरात श्यामभाऊ उमाळकर जेष्ठ नेते आहेत. मुरब्बी राजकारणी आहेत. ते जी भूमिका घेतात ते खुलेआम घेतात. लपूनछपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळेच जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांनी मागील काळात नगरपालिकेवर कॉग्रेसपक्षाची एक हाती सत्ता मिळून अनेकांना सत्तेच्या खुर्चीची संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळेच मेहकर शहरासह संपूर्ण राज्यात धुर्त आणि मुरब्बी राजकारणी म्हणून श्यामभाऊ उमाळकर यांची ओळख आहे. त्यामुळेच जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात अॅड अनंतराव वानखेडे, माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांच्यासारखे अनेकजन त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी इच्छुक असतात एवढे मात्र खरे आहे.
पण जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर व माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांच्यातील गटबाजी आगामी नगरपालिका निवडणूकीत उफाळून येऊ नये म्हणून मेहकर शहरातील एक नामवंत वकील अँड अनंतराव वानखेडे यांनी अंतर्गत गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला आणि जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर व माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांच्यातील दुरावा दुर करण्यात सध्या तरी अॅड अनंतराव वानखेडे यांनी छुप्या पद्धतीने जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या घरी गटबाजीतील मनोमिलनाची चर्चा घडवून आणली आणि अॅड अनंतराव वानखेडे
किमयाचे जादूगार ठरलेतं अशी चर्चा मेहकर शहरात ऐकविण्यात आहे. वास्तवदर्शी असे ऐकविण्यात आहे की, श्यामभाऊ उमाळकर यांच्या घरी माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी घरी गेले होते त्यावेळी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली, त्यावेळी कासमभाई गवळी यांनी श्यामभाऊ उमाळकर यांच्याकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, आता पर्यंत जे झाले त्याला आपण तिलांजली देऊन एकत्रितपणे निवडणूका सामोरे जाऊ अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांनी चाणक्य नीतिचा पवित्रा घेऊन सांगितले की, नगरपालिका निवडणुक जिकांयची असेल तर वरिष्ठ पातळीवर माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे किंवा माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांच्या दोघांपैकी तुम्हाला कोणालाही तिकीट मिळेल त्यांचे काम सर्वांनी आपण एकदिलाने करायचे आहे. त्यावेळी माजी नगराध्यक्ष कासमभाई उमाळकर आणि माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे या दोघांनीही जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या निर्णयाचे स्वागत करुन, जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात नगरपालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती मेहकर शहरातील नामवंत वकील अॅड अनंतराव वानखेडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी फोनवर बोलताना संवाद केला आहे. आता खरचं पोखरलेल्या कॉग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी जेष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांनी घेतलेला निर्णयाचे स्वागत मेहकर शहरातील कॉग्रेसप्रेमी मतदार करीत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसपक्षातील आपसातील हेवेदावे, गट-तट बाजूला ठेवून ज्यांना कोणाला कॉग्रेसपक्ष तिकीट देईल त्यांचे काम सर्वांनी प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात एकदिलाने काम करायचे असा फार्मुला ठरल्यामुळे, प्रतिस्पर्धी राहणाऱ्या विरोधाकांच्या भूवया उंचावलेल्या आहेत. पण खरंच माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी हे प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात एकदिलाने निवडणूकीला सामोरे जाणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारं असलेतरी ‘कहो दिलसे, कॉग्रेस फिरसे’ म्हणत मतदारांसमोर माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे व माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी हे दोघेही एकत्रितपणे निवडणूकीला सामोरे जाणार आहे अशी माहिती ऐकवण्यात आहे. मात्र, हे नेत्यांमधील ऐक्य कायम राहते की पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे जनसंवादाचा विसंवाद ठरतोय यावर शिंदे शिवसेना गटाचे लक्ष्य असणार आहे. एवढे मात्र निश्चित…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका