ताजे अपडेट

“प्रज्वलित मनाचे देवमाणूस”; आयपीएस निलेशजी तांबे

घाटबोरी, प्रतिनिधि

           अभिष्टचिंतन…

“प्रज्वलित मनाचे देवमाणूस“; आयपीएस निलेशजी तांबे

नमन खाकी वर्दीतील पांडुरंगाला, तुम्हीच रक्षणकर्ते, तुम्हीच गगनदिशा, तुम्हीच आधार, तुम्हीच सकल आशा!

आयुष्याच्या क्षितिजावरती उगवणारा सुर्य जर उद्याची पहाट तेजोमय सुर्यप्रकाशांनी उगवणारा असेल तर त्याच्या पहिल्या किरणात मला कायदा व सुव्यवस्था आणि समाजात न्याय प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र जनतेच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या त्या कर्तबगार खाकी वर्दीतील त्यांच्या कर्तृत्वाचा परिमल सोनेरी किरणात दिसतोय. असंच महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील प्रज्वलित मनाचे ‘देवमाणूस’ म्हणून ओळख असलेले बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक आयपीएस निलेशजी तांबे यांनी समता-समरसता व बंधुत्वाची भावना बळकट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ‘गुन्हेगार छोटा असो किंवा कितीही मोठा असो, त्याला बुलढाणा जिल्हा पोलीस कोणालाच सोडणार नाही. या निरपेक्ष भावनेतून ‘गुन्हेगारीवर नियंत्रण, महिला सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यासारख्या विविध सामाजिक मुद्यावर उल्लेखनीय कामगिरीसाठी अल्पावधीतच ‘बुलढाणा जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या संवेदनशील, शिस्तप्रिय, बुद्धीवैभव, आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याची लिलया, परिवर्तनशील विचारसामर्थ्य शब्दबद्ध करणं खरंच माझ्या संतोषजनक लेखणीतील शब्दांना ही कोड पडावं असे झाले आहे. तशी माझी लेखणी कुठेही थबकणार नाही. कारण, मी जरी निष्णात ‘शब्दयोध्दा’ असलोय तरीही शब्दांचे अवडंबर न फोफावता अगदी सहज सुंदर शैलीत स्फुरलेले भाष्य लिखाणातून वास्तवदर्शी मांडणार आहे. आज साहेबांचा अभिष्टचिंतन… सोहळा या निमित्ताने त्यांच्या तेजोमय उल्लेखनीय कामगिरीबद्दल मला लिहिण्याचा योग आलाय. तसं बऱ्याचं दिवसापासून साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर लिहण्यासाठी मनात तळमळ होती.
साहेबांचे कार्यकर्तृत्व खरोखर अतुलनीय, वाखाण्याजोगे असून त्यांची रसाळ, मधाळ, भाषासौष्ठव, विचारसौष्ठव, धाडस, धैर्य आणि विवेकदृष्टि नेतृत्व जिल्हाला अभिमान वाटणारे आहे. यानिमित्ताने मी सर्वप्रथम साहेबांच्या चरणी लीन होऊन, त्यांना सुखसमृद्धी, ऐश्वर्य, दीर्घार्युरारोग्य लाभो, यासाठी भाग्यविधात्याकडे प्रार्थना करतोय.
विदर्भातील नागपूरच्या पवित्र मातीत जन्मलेल्या अंबाझरी येथील येथील रहिवासी असलेल्या या आयपीएस अधिकाऱ्यांची यशस्वी यशोगाथा वाचून किंवा त्यांच्या कार्यकर्तत्वाच्या सुगंधाने माणसाचं मन तृप्त होऊन जाते. त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहिलं की माणसांची मान अभिमानाने ताठ होते. इतकं त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व प्रज्वलित असून ते खरोखरच खाकी वर्दीतील प्रज्वलित मनाचे ‘देवमाणूस’ आहेत. कारण, जनतेच्या रक्षणासोबतच, त्यांची सामाजिक बांधिलकी जोपासणारी परोपकारी भावना आणि दयेने, ममतेने, नेतृत्वाने भरगच्च भरलेले ‘दीपस्तंभ’आहेत. त्यांची संवेदनशीलता, संवाद कौशल्य, विश्लेषणात्मक विचार, निर्णयक्षमता, दूरदृष्टी, विकसनशील संकल्पना आणि जबाबदारी या गोष्टींतून त्यांच्या विचारांचा दीप जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा दुर्जंनाच्या अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणून बुलढाणा जिल्हासह महाराष्ट्रात एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आयपीएस निलेशजी तांबे साहेब यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. एखाद्या विख्यात क्रिकेटपटूच्या नावावर जसा शतकांचा विक्रम जमा असतो, तसाच अनेक क्लिष्ट, चित्तथरारक गुन्हांचा छडा लावण्याचा विक्रम आयपीएस पोलिस अधिक्षक निलेशजी तांबे साहेबांच्या नावावर जमा आहे. आज मोठ्या आशेच्या किरणांनी तक्रारदार आपली कैफियत घेऊन साहेबांकडे जातात. त्यावेळी प्रत्येक तक्रारदारांची सत्यता पडताळून साहेब त्यांना जागेवरच न्याय निवाडा करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवितात आणि आपल्या खाकीच्या आतील दडलेल्या त्या माणुसकीच्या सज्जनशीलतेचे दर्शन घडवितात. म्हणूनच साहेबांच्या कर्तृत्वाबद्दल जन-सामान्यांच्या मनामनात आनंदाचा अत्तरदाणीचा ओलावा कायम आहे. आज साहेब समाजाच्या उन्नतीसाठी चंदनासारखे झिजत आहेत, म्हणून तर साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा परिमळ चहूबाजूंनी दरवळत आहे. तसेच त्यांची रसरशीत वाणी, समरस सौजन्यशील प्रेमळ वागणूक, सकारात्मक विचारसरणी, निस्पृहवृत्ती, कर्तव्यात सत्यता आणि नजरेत सज्जनांची पारख व दुर्जनांची ओळख असं पोलीस दलातील धाडसी, जिगरबाज, कर्तृत्ववान, डोळस ध्येय, स्वच्छ प्रतिमा, नितळ व्यक्तिमत्व त्यांचे आहे. आपल्या कर्तृत्वाचा किंचितसाही त्यांना गर्व नसून, ते चंदनासारखे शितल, निर्मळ मनाचे, निष्णात आहेत. आदरणीय आयपीएस जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे साहेब तरुणांसाठी एक आदर्श प्रसादचंद्रमा आहेत. आजच्या शुभदिनी आदरणीय सर आपणास अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून वाढदिवसाच्या मंगलमय खूप खूप शुभेच्छा!

_________________________________________

                   || सुरक्षित बुलढाणा ||

कोणत्याही शहराचा विकास हा तेथील रस्ते, पायाभूत सुविधांची सहज उपलब्धता आणि गुन्हेगारीवर अंकुश असल्यास जलदगतीने होतो. त्यामुळे शहराची सुरक्षितता राखल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा तर मिळतोच; मात्र, त्याबरोबर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या विकास होतो. बुलढाणा पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात कसलीही कसर सोडलेली नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेशजी तांबे यांच्यासह त्यांच्या अधिकारी व अंमलदारांनी अविरत सेवा बजावत नागरिकांना दिलासा दिला, तर गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले आहे. दामिनी, निर्भया, डायल ११२, जिल्हा कार्यालयाच्या व्हाॅट्सअॅप क्रमांकाच्या माध्यमातून तक्रार मिळताच अवघ्या काही क्षणांत पोलिस घटनास्थळी पोहोचून नागरिकांना आवश्यक ती मदत करत आहेत. तसेच पोलिसांनी स्वतःच्या जिवावर उदार होत गुन्हेगारांचे वार झेलत त्यांना कारागृहात डांबले आहे.

 विश्वास ठेवा, गुन्हेगार सुटणार नाही !

जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू करताच गुन्हेगारांची पळता भुई थोडी झाली आहे. या कारवाईचे सर्वत्र स्वागत असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही,असा संदेश दिला जात आहे. पोलीसांवर विश्वास ठेवा, कोणताही गुन्हेगार सुटणार नाही अशी ग्वाही देत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे यांनी वेळोवेळी नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करीत असतात. गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी जिल्हा पोलीस दल अॅशन मोडवर आहेत. विविध मोहिमा राबवून पोलीसांकडून क्लिनसीटी उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी भीती बाळगु नये, पोलीसांवर विश्वास ठेवावा, वेगवेगळ्या मोहिमेतर्गंत कोणीही कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, गैरप्रकारास झाला असल्यास निर्भयपणे पोलीसांना माहिती द्या, संबंधितावर कठोर कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही कर्तव्यनिष्ठ जिल्हा पोलीस अधिक्षक निलेशजी तांबे साहेबांकडून देण्यात आली आहे.

दामिनी मार्शल्सचा दणका !

जिल्हातील सर्वच पोलिस ठाण्यांत कार्यरत दामिनी मार्शल्सकडे तक्रारदार वा पीडित थेट फोन करून मदत घेतात. त्यासाठी पोलिस जिल्हा पोलिस कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांत स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत. त्यात महिला अंमलदारांची नियुक्ती करुन महिला सुरक्षेस प्राधान्य दिले आहे. यात गुंडाविरोधी पथकांसह दामिनी पथके गस्त घालतात. पोलिस प्रेझेन्स अॅपमध्येही दामिनी मार्शल्सचा समावेश आहे. तसेच टवाळखोरांवर तातडीने कारवाई करुन दणका देतात.

सायबर पेट्रोलिंगमार्फत गुन्हेगारांवर नजर

सोशल मीडियावर गुन्हेगार व गुन्हेगारीचे उदात्तीकरण होईल, असे रील्स, फेसबुक,इन्स्टा, एक्सवर पोस्ट टाकणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेत कायदेशीर कारवाई करण्यास सायबर पोलिसांचा हातभार लागत आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या प्रभावाखाली राहणाऱ्या किंवा त्यांचे आकर्षण वाटणाऱ्या युवकांना वेळीच सावध करीत पोलिस त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करुन मूळ प्रवाहात आणत आहेत, तर अट्टल गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करीत त्यांना कायदेशीर दणके देत आहेत. तसेच सोशल मीडियावर सायबर पेट्रोलिंग करीत गुन्हेगारांची शोध मोहीम त्यांचे समर्थक यांच्यावर सायबर पोलिसांची करडी नजर राहते. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालणाऱ्या भामट्यांचा शोध घेणे, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी तक्रारींची तातडीने दखल घेत संबंधितांचे आर्थिक व्यवहार थांबवणे यासाठी सायबर पोलिस कार्यरत आहेत. तसेच नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून कसा बचाव करावा यासाठी जनजागृती करीत आहेत.

९९ टक्के गुन्ह्यांची उकल

गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडत ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच गुन्हेगारांविरोधात ठोस पुरावे संकलित करून त्यांना न्यायालयाकडून शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न असतात. त्यानुसार वर्षभरात अनेक सराईत गुन्हेगारांना शिक्षा झाल्या आहेत. तसेच नुकत्याच लागू झालेल्या भारतीय न्याय संहितेनुसार चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस वर्षभर शिक्षा देत पोलिसांनी गुन्हेगारांना कठोर इशारा दिला आहे. न्यायालयात पोलिसांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी पैरवी अधिकारी नेमले असून, ते प्रत्येक गुन्ह्यावर लक्ष ठेवून संबंधित तपासी अधिकाऱ्यासोबत संपर्कात असल्याने युक्तिवादादरम्यान, कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे निकाल लवकर लागण्याची मदत होत आहे.

विधिसंघर्षितांना आधार

चोरी, घरफोडी, खून, खुनाचे प्रयत्न, सशस्त्र हल्ले, हत्यारे बाळगणे अशा गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग आढल्याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक निलेशजी तांबे यांनी घेतली आहे. त्या अन्वये असंख्य विधिसंघर्षित बालकांची संख्या यादी तयार करून अनेक बालकांचे समुपदेशन करीत अनेक मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदारांची थेट भेट

कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रारदार पीडित कैफियत घेऊन आल्यास तेथील अंमलदार आपुलकीने त्याला विचारतात. तक्रारदारास जिल्हा पोलिस अधीक्षक निलेशजी तांबे यांना नि:संकोच भेटता येते व आपली तक्रार किंवा गाऱ्हाणी मांडता येतात.

✒️ संतोष अवसरमोल पत्रकार/ लेखक
मु. पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो: 9689777129

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका