ताजे अपडेट

मेहकरमध्ये जखमी शालेय विद्यार्थ्यांना DYSP संतोष खाडे यांची तत्काळ मदत

घाटबोरी, प्रतिनिधी

 

मेहकरमध्ये जखमी शालेय विद्यार्थ्यांना DYSP संतोष खाडे यांची तत्काळ मदत

मेहकर शहरात घडलेल्या एका अपघातात जखमी झालेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करून वेळेवर उपचार मिळवून दिले. दि. ५ फेब्रुवारी रोजी शहरातील अग्रवाल पेट्रोल पंप परिसरात छोट्या वाहनाला लटकण्याच्या प्रयत्नात दोन अल्पवयीन विद्यार्थी जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना तातडीने गाभणे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना, अपघाताची माहिती पसरताच हॉस्पिटल परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. याच वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हे आपल्या वाहनाने कार्यालयाकडे जात असताना हॉस्पिटलबाहेरील गर्दी त्यांच्या निदर्शनास आली. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी त्वरित वाहन थांबवले आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमी विद्यार्थ्यांभोवती जमलेली गर्दी त्यांनी बाजूला केली आणि कोणताही विलंब न करता एका जखमी विद्यार्थ्याला स्वतः उचलून रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांनी उपस्थित डॉक्टरांना विद्यार्थ्यांची तातडीने व काळजीपूर्वक वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. वैद्यकीय तपासणीनंतर विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक औषधोपचारानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दाखवलेली तत्परता आणि आपत्कालीन परिस्थितीतील भूमिका नागरिकांच्या निदर्शनास आली असून, त्यांच्या या कृतीबाबत विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

——————————
हातात न्यायाची लेखणी, हृदयात माणुसकीचा ठेवा, अंधारातही उभा राहणारा विश्वासाचा दीप. जखमीच्या जीवाला धीर आणि उब देणारा हात, DYSP संतोष खाडे यांच्या संवेदनशीलतेतून माणुसकीचे प्रत्यक्ष दर्शन घडते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका