राजकारण

इच्छुकांचे देऊळ पाण्यात, अद्याप कोणाच्याही नावास हिरवी झेंडी नाही

घाटबोरी, प्रतिनिधी

इच्छुकांचे देऊळ पाण्यात, अद्याप कोणाच्याही नावास हिरवी झेंडी नाही

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर पासून नामांकन अर्ज भरणे सुरू होणार आहे. निवडणूकीकरीता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतांना कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या अध्यक्ष पदासह, सदस्य पदाच्या उमेदवारांची अधिकृत अशी घोषणा केलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांचा जिव भांड्यात अडकला आहे. शहरात सध्याच्या परिस्थितीमध्ये शिंदे शिवसेना, कॉग्रेस या पक्षामध्ये चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा आहे. निवडणूकीमध्ये अंतीमक्षणी कोणकोणते उमेदवार अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करतात त्यावरही राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. नामांकन अर्ज भरणे सुरू होण्याकरीता अवघ्या दोन दिवसाचा कालावधी शिल्लक असतांना कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत अशी घोषणा केलेली नाही. फक्त पार्टी लेवलवर पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातील प्रभागात जावुन मतदारांच्या भेटीगाठी, कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आपलेच तिकीट फायनल होणार असल्याचे जो-तो ठासून सांगत आहेत. यंदा निवडणूकीच्या रणधुमाळीसाठी अत्यंत कमी वेळ मिळाला असून, ऐन वेळेवर उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. आतापासून उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली असून, उमेदवारी घोषित होण्याआधीच इच्छुक उमेदवार कामाला लागलेले आहे. १० नोव्हेंबर पासून निवडणूकीच्या रणधुमाळीला आणखीनच वेग येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अजूनच धावपळ वाढणार आहे. सध्यातरी कोणत्याच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची घोषणा नसल्याने, इच्छुकांचे देऊळ पाण्यात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका