ताजे अपडेट

घाटबोरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन

घाटबोरी, प्रतिनिधी

घाटबोरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन 

महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १४ मार्च २०२६, शनिवार रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच सामान्य नागरिकांना एका छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ मिळणार आहे. या शिबिरासाठी मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार निलेश मडके, मंडळ अधिकारी एम. एस. गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी जि. ए. उंबरकर, भोसा तलाठी एम. एस. सदार, तलाठी व्ही. व्ही. काळे, तलाठी एस. डी. वाठोरे आदी महसूल अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात फेरफार अदालत, सातबारा दुरुस्ती, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र वाटप, श्रावणबाळ व संजय गांधी योजना, प्रलंबित प्रकरणांची मंजुरी, नवीन रेशनकार्ड वाटप व विभक्तीकरण, वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये रूपांतर अशा विविध महसूल सेवांबाबत कामे करण्यात येणार आहेत. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन, आरोग्य विभागामार्फत आभा कार्ड वाटप, पोस्ट विभागाच्या योजनांची माहिती, पीएम किसान योजनेतील प्रलंबित हप्ते व लँड सीडिंग, शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी तयार करणे, ई-मोजणीसाठी अर्ज स्वीकारणे, सलोखा योजनेचे अर्ज, लाडकी बहिण योजनेसाठी केवायसी, आधार अपडेट सुविधा अशा अनेक जनहिताच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून लोणीगवळी मंडळातील घाटबोरी, नागेशवाडी, भोसा, भिवापूर, रत्नापूर, गारखेड, जांभरुण, लोणीगवळी, आंधृड, उमरा, लावणा, मोळा, मोळी व शहापूर या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी केले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका