कॉग्रेस पक्षाने संधी दिल्यास नगरसेवकांची निवडणूक लढविणार : शेख युनुस (पटेल )
घाटबोरी, प्रतिनिधी

कॉग्रेस पक्षाने संधी दिल्यास नगरसेवकांची निवडणूक लढविणार : शेख युनुस (पटेल )
मेहकर नगरपरिषदेचे प्रभाग रचनेचे आरक्षण जाहीर होताच नगरपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांची गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे. पण मेहकर शहरात कॉग्रेसपक्षासोबत एकनिष्ठ व प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, यांचा एक विश्वासु सहकारी म्हणून प्रभाग क्रमांक-3 मधिल रहिवासी असलेले शेख युनुस ( पटेल ) आपल्या सामाजिक कार्यकर्तृत्वामुळे शहरात यांच्या नावाला अधिक पसंती आहे. शेख युनुस (पटेल) यांच्याकडे माणसे जोडण्याची कला असून त्यांची नाळ प्रत्येक जातीधर्माशी जुळलेली आहे. प्रत्येकांच्या सूखदु:खात सहभागी होऊन, जनमानसांच्या समस्या सोडविण्यात ते कायम पूढे असतात. त्यांचे संबंध सर्वांसोबत सलोख्याचे असून त्यांच्याकडे सर्वधर्मसमभावाची भावना आहे. शांत, समयी, स्वभाव असून ते अभ्यासू उच्चशिक्षित स्वच्छ चेहरा आहे. त्यांना प्रभागातील सर्व समस्याची जाण आहे. सर्वसामान्य तळागाळातील प्रत्येक खचलेल्या माणसांना आधार देण्याची वृत्ती शेख युनुस पटेल यांच्याकडे आहे. एवढेच नव्हे तर विविध कार्यक्रमांत त्यांचे मराठी भाषेत सुत्रसंचालन अत्यंत प्रभावशाली असून ते जनतेच्या सेवेसाठी तत्पर उपलब्ध असतात. त्यामुळे मेहकर शहरातील नागरिकांची इच्छा आहे की शेख युनुस पटेल यांनी नगरपरिषदेची निवडणूक लढवावी आणि ती सुद्धा प्रभाग – 3 मधूनच, यासाठी शेख युनुस पटेल यांच्याही नावाचा विचार व्हावा असे सर्वसामान्य नागरिकांतून बोलल्या जात आहे. येणाऱ्या काळामध्ये हा आश्वासक चेहरा विकासाचा चेहरा ठरु शकतो अशी चर्चा संपुर्ण मेहकर शहरामध्ये आहे. यासंदर्भात शेख युनुस पटेल यांच्यासोबत संपर्क साधला असता तेव्हा युनुस पटेल म्हणाले की, प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी सोडविणे हे माझे कर्तव्य आहे. आता जनतेच्या आग्रहास्तव प्रभाग-3 मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहो पण कॉग्रेसपक्षानी संधी दिल्यास नगरसेवकांची निवडणूक लढविणार आणि नगरपरिषदेचे मैदान गाजवणार व विजयश्री सुद्धा खेचून आणणार आहो यात तिळमात्र शंका नाही. असे शेख युनुस (पटेल) यांनी बोलताना सांगितले आहे.



