राजकारण

मेहकर शहरातील जनता हेच माझे दैवत: विलासजी चनखोरे

 

मेहकर शहरातील जनता हेच माझे दैवत : विलासजी चनखोरे 

 

मेहकर शहर हेच माझं मंदिर आणि येथील जनता-जनार्दन हेच आपले दैवत आहे. आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या समस्या सोडवणे हे आपले कर्तव्य आहे. याचं उद्धार भावनेने त्यांच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या सेवेसाठी वाहिलेले आहे. या जनता-जनार्दनांच्या पाठबळावरच मी अनेक पदाचा मानकरी होण्याचा मला मान मिळाला आहे. जनतेचा मी ऋणी असून त्यांचा मी सेवक आहे. या शहरातील जनता-जनार्दनाचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा पाहुन अक्षरशः मी भारावून गेलोय आहे. त्यांच्या आग्रहावास्तव आता आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहो, या मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. तसेच माझे राजकीय गुरुवर्य आदरणीय माजी केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक, कॉग्रेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ, कॉग्रेसपक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर आणि कॉग्रेसपक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुजी बोंद्रे या सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. म्हणूनच आगामी नगरपालिका निवडणूकीचे रणांगण गाजवणार आहो. त्यावेळी विरोधक कोणताही असू द्या त्याला चारीचित्त करण्यास अगदी सोपे जाणार आहे. असे मेहकर नगरीचे माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दिवशी माध्यमांशी दिलखुलास गप्पा मारताना बोलत होते.
यापूढे विलासजी चनखोरे बोलताना म्हणाले की, मेहकर शहरातील मायबाप जनतेची सेवा करण्यात कुठेही कमी पडणार नाही. कारण, मेहकर शहरातील जनता-जनार्धनाला माझ्यावर पुर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला मी कदापी तडा जाऊ देणार नाही. तसे येथील जनतेने मला अनेकवेळा त्यांच्या समस्या सोडवितांनी अनुभवलेले आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करत असताना मायबाप जनतेने आणलेल्या समस्या आणि अडचणी सोडविल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान मनाला आनंद देऊन जात असतो. मागील वेळी अतिक्रमण धारकांवर जो अन्याय झाला तो सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या समस्या, अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शहरातील नाल्यांची साफसफाई, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, विद्युत पुरवठा, त्यांच्या मूलभूत सोयीसुविधा अशा अनेक समस्यांच्या सोडविण्याचा मी प्रामाणिकपणे त्यांची सेवा करीत आहो. त्यांच्या प्रत्येक संकटाच्या काळात मी माझ्या मायबाप जनतेच्या सोबत उभा होतो आणि संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या सोबतच राहणार आहे. यात तिळमात्र कुठलेही शंका नाही. अशी खात्री देत, जनतेचा सेवक म्हणून मेहकर शहरातील विकासकांमासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहीन, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष विलासजी चनखोरे यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका